Breaking News

माजी आमदार राजीव राजळे पंचतत्त्वात विलीन

शनिवारी रात्री झाल होते निधन - शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र माजी आमदार राजीव राजळे यांच शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई येथे ग्लोबल हॉस्पिटल  मध्ये उपचार घेत असतांना हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या (48)वर्षी निधन झाले. गेल्या दिड महिन्यांपासून राजळे हे दवाखान्यात उपचार घेत होते.त्यांच्या  पार्थिवावर कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी 3.30  वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार  राजळे  यांच्यावर प्रेम करणारा  लाखोंच्या जनसमुदाय उपस्थित होता. 
 जिल्ह्यातील एक तरुण तडफदार सूर्य मावळला..
राजीव राजळे याचं निधन झाल्याचे समजताच अनेक जणांना धक्का बसला. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव  मुंबईवरून  कासार पिंपळगाव या  त्यांच्या राहत्या घरी  आणण्यात आले.  तर आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी शेवगाव - पाथर्डी या तालुक्यांसह जिल्हाभरातील अनेक समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी  केली होती.आलेल्या काही नागरिकांना आपला नेता आपल्याला पुन्हा कधी दिसणार नाही या कल्पनेने अश्रू अनावर झाले. पाथर्डी, तिसगाव या गावातील लोकांनी  आपल्या लाडक्या नेत्यांसाठी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. पाथर्डी - तिसगाव, तिसगाव - कासारपिंपळगाव, शेवगाव -  कासारपिंपळगाव या मार्गावर  अनेक ठिकाणी लोकांनी फ्लेक्स लावून राजळे यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी 2 च्या सुमारास हारफुलांनी सजविलेल्या ट्रकमधून माजी  आमदार राजळे यांची अंत्ययात्रा वृद्धेश्‍वर कारखानामार्गे शेवगाव रोडने टाळ मृदूंगाच्या गजरात निघाली. दुपारी 3.30 च्या दरम्यान चिरंजीव कृष्णा व बंधू राहुल यांनी  पार्थिवाला अग्नी दिला.
त्यानंतर शोकसभा घेण्यात आली. यावेळी बोलताना विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, राजाभाऊंनी विधिमंडळात चांगले काम केले. माजी  वनमंत्री बबनराव पाचपुते विधानसभेत काम करत असताना उत्कृष्ट चांगले भाषणे राजळे करत होते.
यावेळी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, पर्यटन मंत्री प्रकाश रावल, आ. शिवाजी कर्डीले, आ.स्नेहलता कोल्हे, अकोले आ.वैभव पिचड,  आ. भीमराव  धोंडे, आमदार बाळासाहेब  मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, राष्ट्रवादीचे   जिल्ह्याध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर,  सुजय विखे, माजी जि. प. अध्यक्ष  विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे,माजी आ.ज यंतराव ससाणे, आशुतोष काळे, राहुरीचे प्राजक्त तनपुरे,  शिवसेनेचे शशिकांत गाडे, जि.प.सदस्य अनिल कराळे, प्रभावती ढाकणे, रफिक शेख, जेष्ठ कम्युनिष्ट बाबा आरगडे, संजय कळमकर,जिल्हा परिषद सदस्य सुनील  गडाख,राजेंद्र गुगळे, सोलापूरचे आयुक्त अविनाश ढाकणे, माजी खासदार दादापाटील शेळके, उद्योजक किरण शेटे आदी उपस्थित होते.
राजीव राजळे यांचे परिचय
संपूर्ण नांव - राजीव अप्पासाहेब राजळे
जन्मतारीख -05 डिसेंबर 1969
शिक्षण -बॅचलर ऑफ आर्किटेक्ट (बी.अर्थशास्त्र)
व्यवसाय -शेती,सामाजिक सेवेची आवड
पत्ता -मु.पो.कासारपिंपळगाव
ता.पाथर्डी, जि.अहमदनगर
भूषवीत असलेली पदे -
जिल्हा संघटक -अहमदनगर जिल्हा युवक काँगे्रस (आय)
संचालक       -पाथर्डी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ
                  मर्यादीत पाथर्डी ,अहमदनगर
मुख्य प्रवर्तक -नियोजीत श्री वृध्देश्‍वर सहकारी तालुका,
                दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या, पाथर्डी
संचालक -दि.अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक.लि.अ.नग
कार्यकारी परिषद सदस्य ः महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
संचालक -श्री वृध्देश्‍वर सहकारी साख कारखाना लि.
           आदिनाथनगर (सहकारी बँक प्रतिनिधी)
अध्यक्ष -पाथर्डी तालुका देखरेख संघ मर्यादीत, पाथर्डी
संस्थापक अध्यक्ष -राजीव युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,पाथर्डी
अध्यक्ष -पाथर्डी तालुका क्रिकेट असोसिएशन पाथर्डी
सदस्य -अदिनाथ कृषि विकास प्रतिष्ठाण, आदिनाथनगर आदी
सल्लागार -दादापाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथनगर