Breaking News

कुंटणखान्यावर धाड टाकून दोन तरूणींची सुटका

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - भर वस्तीत आकाशवाणी समोरील अहिंसानगरमध्ये सुरू असलेल्या उच्चभ्रू कुटंणखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी (दि.24) रात्री छापा  मारला. या छाप्यात दलालासह आंटीला अटक करून तेथे वेश्या व्यवसायासाठी मुंबईहून आणण्यात आलेल्या दोन तरूणींची मुक्तता केली. या कारवाईने अहिंसानगरात खळबळ  उडाली. प्रवीण बालाजी कुरकुटे (35,रा. ज्योती प्राईड, सातारा परिसर) आणि आंटी यांचा आरोपीत समावेश आहे. अहिंसानगरातील एका बंगल्यात कुंटणखाना सुरू असल्याची मा हिती खब-याने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक सदर बंगल्यात पाठवून शहानिशा केली खब-याने पोलिसांना फोन करून इशारा केला. यावर बंगल्याच्या  परिसरात थांबलेल्या पोलिसांनी तेथे धाड मारली. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष बनावट ग्राहकांकडून आरोपींनी घेतलेली रक्कम व आरोपींचे मोबाईल जप्त केली. वेश्या व्यवसाय करून  घेण्यासाठी तेथे मुंबईहून आणलेल्या दोन मुलींची मुक्तता केली.