Breaking News

लोकरंगभूमीचे अभ्यासक प्रा. रूस्तुम अचलखांब यांचे निधन

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्राचे माजी विभागप्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक, लोकशाहीर, नाट्यसमीक्षक डॉ. रुस्तुम  अचलखांब यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ अचलखांब यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात  आले. मंगळवारी रात्री त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. अचलखांब यांनी अभिनय केलेल्या  गाढवाचे लग्न या गाजलेल्या लोकनाट्याचे 150 प्रयोग झाले होते. त्यामधील सावळा कुंभाराची भूमिका चांगलीच गाजली होती. 2009 मध्ये पुण्यात पिंपरी चिंचवड येथे झालेल्या  अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले होते. शिवरायांचा आठवावा प्रताप’ या नाटकातून अचलखांब यांनी गोंधळ, भारूड या माध्यमातून शिवाजी महाराज  साजावून सांगितले होते. डॉ. अचलखांब यांचा लोकनाट्य, तमाशा आणि लोककलांचा विशेष अभ्यास होता. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. डॉ. अचलखांब यांनी 70  नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यातील महत्त्वाचे संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांचा समावेश होता. महात्मा फुले लिखित ’तृतीयरत्न’ या नाटकाचे  त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पाश्‍चात्य रंगभूमी कळावी यासाठी त्यांनी मराठीतून पुस्तके लिहिली. त्यांचे अभिनयशास्त्र, तमाशा लोक रंगभूमी आणि गावकी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.