Breaking News

दादरमध्ये दिवाळीनिमित्त बालगोपाळांनी साकारला पद्मदुर्ग किल्ला

मुंबई, दि. 15, ऑक्टोबर - नायगाव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( रजि.) प्रस्तुत श्री अष्टभूजा प्रतिष्ठान ( रजि.) यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी माता मित्र मंडळ मधील बालगोपाल यांनी आपला इतिहास व संस्कृती जपण्यासाठी सालाबादप्रमाणे यावर्षी किल्ला (पद्मदुर्ग किल्ला) 10 ÷ 10 फूट मापाचा बनविण्यात आला आहे. नायगाव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे वर्ष 75 वे (अमृतमहोत्सव) आहे. त्यासाठी या वर्षी गडसंवर्धन मदत निधी देण्याची संकल्पना आयोजित करण्यात आली आहे.
या मोहिमेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई व श्री दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत संकपाळ(8691087533) व योगेश अमृते (9869859982) या क्रमांकावर संपर्क साधावा. पत्ता : भवानी माता मंदिर, जुनी बीडीडी चाळ क्रमांक 1 व 19 मधील पटांगण, नायगाव, दादर.