Breaking News

जळगाव एमआयडीसी विस्तारासाठी नवीन भूसंपादन करणार; उद्योग राज्यमंत्र्यांचे आश्‍वासन

जळगाव, दि. 12, ऑक्टोबर - जळगाव परिसरात औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी रेडिरेकनरच्या पाचपट दराने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन उद्योग राज्यमंत्री  प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले.
जळगाव शहरात औद्योगिक वसाहतीचा विस्तार व्हावा तसेच तेथील विविध समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी मागणी केल्यानुसार 11 ऑक्टोबर रोजी उद्योग  राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार भोळे यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणाचे अधिकारी, जळगाव मनपाचे अधिक ारी, उद्योग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री पाटील यांनी जळगाव औद्योगिक वसाहतीतील 22 जुने भूखंड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली.
नवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र औद्योगिक प्राधिकरणाने नशिराबाद, उमाळा परिसरातील जागेचे भूसंपादन करावे, असे आमदार भोळे यांनी सुचविले. त्यावर राज्यमंत्र्यांनी त्या  परिसरातील नागरिकांच्या तक्रारी नसल्यास तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल. तसेच त्यांना रेडिरेकनरच्या पट भूसंपादन रक्कम देण्यात येईल, असे सांगितले. जळगाव शहर आणि प रिसरातील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचेही भोळे यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीतील सुमारे 20 किलोमीटर लांबीचे रस्ते दुरुस्तीसाठी प्रस्ताव संबं धित विभागाला पाठवण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.
कचरा टाकणार्‍यांवर गुन्हे दाखल करणार
जळगाव औद्योगिक वसाहतीत उघड्यावर कचरा टाकण्यावरून होत असलेल्या वादाबाबत आमदार भोळे यांनी लक्ष वेधले असता औद्योगिक वसाहतीत गस्तीसाठी काही कर्मचार्‍यांची  नेमणूक करण्यात येईल. तसेच उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.