Breaking News

मुंबईमध्ये 31 टक्के कर्मचारीवर्ग तणावग्रस्त !

मुंबई, दि. 12, ऑक्टोबर - लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्व्हेक्षणात मुंबईतील कर्मचारी वर्ग सर्वाधिक तणावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील सुमारे  31 % कर्मचारी तणावग्रस्त असून ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई खालोखाल दिल्लीचा क्रमांक लागतो.
मुंबईतील 31 % नोकरदार वर्ग तणावाखाली काम करतो. तर दिल्लीतील 27 % कर्मचारी तणावग्रस्त आहेत. यानंतर बंगळुरु (14 %), हैदराबाद (11 %), चेन्नई (10 %) आणि क ोलकाता (7 %) यांचा क्रमांक लागतो. अतिशय व्यस्त दिनक्रम, उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी असलेला दबाव, ऑफिसमधील राजकारण, ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबून करावे लागणारे क ाम, वरिष्ठांचे वर्तन, त्यांच्याकडून न मिळणारे प्रोत्साहन, काम आणि घर यांच्यातील असंतुलन यामुळे अनेक कर्मचारी तणावाखाली जगत असल्याचे आढळून आले आहे.