Breaking News

भाजप जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार - सुप्रिया सुळे

पुणे, दि. 01, नोव्हेंबर -केंद्रात आणि राज्यात असलेले भाजपचे सरकार हे फक्त जाहिरातबाज आणि जुमलेबाज सरकार असून हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यात  सपशेल अपयशी ठरले असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका भवनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. आज खासदार सुप्रिया  सुळे यांनी गावांना मूलभूत सुविधा पुरवितांना पाणी, कचरा, रस्ते याचे नियोजन महापालिका कसे करणार या बाबतीत चर्चा करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची  भेट घेतली. 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन तीन वर्षांचा कालावधी होऊन गेला. मात्र कोणत्याही कामात हे सरकार यशस्वी झाले नाही. कर्जमाफी हे  सरकारचे सर्वात मोठे अपयश असून राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्याचे पैसे दिवाळीमध्ये प्रत्येक शेतक-यांच्या खात्यावर जमा होतील अशी घोषणा करण्यात  आली. मात्र अद्याप एकाही शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. तसेच पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला. मात्र त्या प्रकल्पाचे काय झाले, असा सवाल  उपस्थित करीत हे सरकार म्हणजे जुमले की सरकार अशा शब्दात भाजपवर त्यांनी निशाणा साधला.त्या पुढे म्हणाल्या की, समाविष्ट गावांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते.  या बजेटमध्ये पहिल्यांदा गावाच्या कामांना निधी ठेवला नाही. यासाठी सरकारने एक समिती स्थापन करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न  गंभीर झाला असून रिंग रोडसाठी जागा संपादन करणार कधी आणि अजूनही कचरा प्रकल्प प्रलंबित आहे, या बाबत चिंता वाटते असे त्या म्हणाल्या.