Breaking News

गोसीखुर्दमुळे 62 हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ

नागपूर, दि. 01, नोव्हेंबर -  केंद्रीय जल आयोगाने गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाला नाबार्डच्या माध्यमातून 750 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे धरणाच्या  मुख्य कालव्याव्दारे 62 हजार 263 हेक्टर शेतीला पाणी मिळणार असून लाभक्षेत्रातील 30 हजार 600 हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अ भियंता अरुण कांबळे आणि अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी ही माहिती दिली.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्हयाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण क रण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये 620 दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. या प्रकल्पातून 62 हजार 263 हेक्टर  क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून या प्रकल्पाच्या पाणी वितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.  त्यासाठी 2019-20 पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प 9 घटका मिळून तयार झाला असून यामध्ये मुख्य धरण 4 उपसासिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोला-मेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच  उपसासिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत असल्यामुळे भात पिकासह इतर पीकांच्या  उत्पादनामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित आराखडयानुसार पूर्ण करण्याला मुख्यमंत्र्यांनी प्राथमिकता दिली आहे.
पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा 99 किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्हयातील सुमारे 71 हजार 810 हेक्टर सिंचन निर्माण  होणार असून त्यापैकी 13 हजार 926 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा 23 किलोमीटरचा असून यामधून 31 हजार 577 हेक्टर सिंचन क्षमता  निर्माण होणारअसून त्यापैकी 10 हजार 683 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोला मेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची  लांबी 43 किलोमीटरची आहे. यामधून 12 हजार 356 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.
गोसीखुर्द प्रकल्पामधून तीन जिल्हयांना प्रत्यक्ष लाभ मिळत असून यामध्ये नागपूर जिल्हयातील 22 हजार 997 हेक्टर सिंचन क्षमतेपैकी 13 हजार 696 हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या  सुविधा निर्माण झाल्या आहेत. भंडारा जिल्हयातील 87 हजार 647 क्षमतेपैकी 24 हजार 300 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुरु आहे, तर चंद्रपूर जिल्हयातील 1 लक्ष 40 हजार 156  सिंचन क्षमतेपैकी 24 हजार 206 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. या प्रकल्पावर चार उपसासिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर 7 हजार 710  हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर 11 हजार 195 हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रक ल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे.