Breaking News

साबां - चौकशी अहवालावर दादा मंञ्यांची गुळणी

भ्रष्टाचाराला स्री दाक्षिण्याची ओवाळणी

मुंबई - (विशेष प्रतिनिधी), दि. 27, ऑक्टोबर - सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराला आणि भ्रष्ट अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम मंञ्यांचेच अभय आहे यावर शिक्कामोर्तब  करणारा दस्त हाती लागला आहे.भ्रष्टाचाराला अनियमितता संबोधून मंञी कार्यकारी अभियंत्यांच्या पदरात स्री दाक्षिण्य टाकण्यामागच्या रहस्यांवरही हा अभिलेख प्रकाश टाकीत  आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराला मुक पाठींबा देणारे चंद्रकांत दादा पाटील महसूल खात्याचाही कार्यभार सांभाळीत असून या दोन्ही खात्याचा कारभार  मुख्यमंञ्यांच्या पारदर्शतेवर प्रश्‍न चिन्ह ठरला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात सुरू असलेला  गैरव्यवहार वेळीच थांबविला नाही तर त्याच्या परिणामांची दाहकता किती या प्रश्‍नाचे उत्तर माजी मंञी छगन भुजबळ यांच्यापेक्षा चांगले  कुणीच देऊ शकणार नाही.छगन भुजबळ यांनी अभियंते आणि त्यांचे कथित अनुयायांवर ठेवलेला फाजील आत्मविश्‍वास आर्थर चा प्रवास घडविण्यास कारणीभूत ठरला.साबांच्या इ तिहासात एव्हढे मोठे उदाहरण समोर असतांनाही साबांची विद्यमान यंञणा त्यातून धडा घ्यायला तयार नाही.भुजबळ आणि तत्कालीन साबांची कार्यपध्दती आहे तशीच स्वीकारून  विद्यमान साबां मंञ्यांचा कारभार सुरू असल्याने भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
दोन आठवड्यापुर्वी मनोरा आमदार निवास इमारतीच्या काही खोल्यांमध्ये झालेल्या कामाच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघड झाल्या नंतर मुंबई साबां प्रादेशिक विभागातील शहर ईलाखा  विभाग आणि कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके चर्चेत आल्या.या गैरव्यवहारात कार्यकारी अभियंता या दोषी आहेत .असे चौकशी अहवाल स्पष्टपणे नमूद करतो.तरीही त्यांच्यावर कु ठलीही कारवाई न करता केवळ अकार्यकारी पदावर बदली अशी जुजबी कारवाई करून प्रशासनासह स्व सरकारची दिशाभूल केल्याची चर्चा आहे.
आ.चरणभाऊ वाघमारे,आ.भरत गोगावले यांनी तक्रार केल्या नंतर सुरूवातीला साबां प्रशासन आणि साबां मंञालयाने या गैरव्यवहाराच्या तक्रारीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्याची भु मिका घेतली होती.माञ तक्रारदार लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून हे प्रकरण हाताळले.मंञी आणि प्रशासन पातळीवर भ्रष्ट अभियंत्यांना पाठीशी घातले जात असल्याचे  लक्षात आल्यानंतर आ.चरणभाऊ वाघमारे यांनी अखेर मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची विनंती केली,त्यानंतर या गैरव्यवहाराच्या चौक शीने खर्या अर्थाने वेग घेतला.
मुख्यमंञ्यांनी महाराष्ट्राला दिलेला पारदर्शकतेचा शब्द पाळून साबांचे प्रधान सचिवांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले.प्रधान सचिवांनींही अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी  यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.अधिक्षक अभियंता सुर्यवंशी यांनी निष्पक्षपणे चौकशी करून 5 आक्टोबरला सादर केलेल्या अहवालात गैरव्यवहार  झाल्याचे नमूद करून या गैरव्यवहाराची जबाबदारी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि त्यांचे दोन सहकारी सह अभियंता यांच्यावर निश्‍चित केली,तसा स्पष्ट उल्लेख या अहवालात  आहे.
हा अहवाल स्पष्ट शब्दात भ्रष्टाचार झाला आणि त्यास कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके या जबाबदार आहेत हे सांगत असतांना या खात्याचे मंञी चंद्रकांत दादा पाटील माञ या प्रक रणात दोष ठेवलेले दोन सह अभियंत्यांना निलंबीत करतात आणि मुख्य जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी भ्रष्टाचार नव्हे तर अ निमियतता झाली अशी मल्लीनाथी करतात,साबां मंञ्यांच्या या भुमिकेवर संशय व्यक्त केला जात असून संशयितांवर ओवाळून टाकले जाणारे हे स्री दाक्षिण्य महागात पडू शकते अशी  भिती व्यक्त केली जात आहे. (क्रमशः)