Breaking News

विजय मोदींच्या पप्पूचा....!

दि. 27, ऑक्टोबर - सबका साथ सबका विकास ही घोषणा गाठोडीला बांधून देशावर अच्छे दिन ची खैरात करण्यास निघालेली नरेंद्र मोदी भाजपा लि.कंपनीचे घोडे कच्छच्या  वाळवंटात दम टाकू लागले आहे,गेली तीन चार वर्ष मोदी आणि कंपनीच्या नजरेत पप्पू ठरलेल्या राहूल नावाच्या एका नेत्याने या कंपनीला पळता भुई थोडी केल्याचे माध्यमांचे नि रिक्षण आहे.
जी माध्यमं तीन वर्षापुर्वी मोदींचा फिव्हर वाढवून काँग्रेस आणि सोनियांच्या पप्पूला थंडी भरविण्यास कारणीभूत ठरली तीच माध्यमं एखाद दुसरा पेड अपवाद वगळता मोदी आणि कं पनीच्या डोक्याचा फिव्हर वाढण्यास कारणीभूत ठरली आहेत.
गुजरात विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम काल जाहीर झाला. पण निवडणूका नजरेसमोर ठेवून काँग्रेस पक्षाने जवळपास महिना दोन महिने आधी प्रचाराची रणधुमाळी उडवून  दिल्याने गुजरातींचा असंतोष रस्त्यांवर दिसू लागला.या असंतोषाची चाहूल लागल्यानंतर भाजपेयींच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
गुजरातचे वातावरण आज भाजपाला अनुकूल नसल्याचे जनमानसाच्या प्रतिक्रियेवरून जाणवू लागले आहे, याच प्रतिक्रियांचे प्रतिबिंब आयबीच्या गुप्त अहवालातूनही पडू लागल्याने  पंतप्रधान कमी आणि भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून वावरणार्या नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत.मोदीसोबत मास्टर माईंड अमित शाह देखील सैरभैर झाल्याचे दिसते.
गुजरात इंटेलिजिएन्स ब्युरो ने नुकताच एक गुप्त अहवाल दिला असून या अहवालात गुजरातच्या जनतेची मानसिकता स्पष्टपणे नमूद केली आहे. राजा बोले दल हाले अशी प्रथा  असली तरी यावेळी राज्य गुप्तचर यंञणेने आपले काम प्रामाणिकपणे तडीस नेऊन आहे ती परिस्थिती सरकारच्या समोर ठेवली आहे,अर्थात यंञणेच्या प्रामाणिकपणा पेक्षा जनमानस  उघडपणे व्यक्त होऊ लागल्याने गुप्तचर यंञणेला कोंबड झाकता आले नाही.
या यंञणेच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे राज्यात भाजपाची परिस्थिती अतिशय गंभीर असून सत्तर जागा मिळवणे देखील त्यांच्या आवाक्याबाहेर असणार आहे.त्याचवेळी  भाजपाच्या नजरेतील पप्पूची काँग्रेस सहजपणे 95 चा आकडा ओलांडून जाईला, इतकेच नाही तर यावेळी अपक्ष निवडून येणार्या आमदाराःची संख्याही लक्षणिय राहणार असून या  अपक्षांचा कल काँग्रेसकडे असणार आहे.
या परिस्थितीला नरेंद्र मोदी आणि कंपनी जबाबदार असल्याचा मतप्रवाह आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेला दिलेल्या भुलथापा भोवल्या आहेत. जिएसटीच्या मुद्यावर  व्यापार्यांची ओढवून घेतलेली नाराजी आता व्यक्त होऊ लागली आहे, पाटीदार समाजाची केलेली कोंडी,सामाजिक आंदोलनाचा वणवा पेटविणार्या कार्यकर्त्यांची साम दाम दंड भेद  नितीचा अवलंब करून आंदोलनाची मुस्कटदाबी या सारखे काही मुद्दे सरकार विरोधी नाराजीत भर टाकु लागले आहे.
या एकूण असंतोषात हार्दिक पटेल आणि त्याच्या सहकार्यानी पेटवलेल्या वणव्याचा राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने नेमका फायदा उचलल्याने पक्षाला सकारात्मक फायदा  होतांना दिसतो आहे.
राहुल गांधी, हार्दिक पटेल या मंडळींच्या नेतृत्वाखाली जनमानसात भाजपावीरोधी वातावरणाने एव्हढे टोट गाठले की अवघ्या 25 दिवसात तिसर्‍यांदा पंतप्रधान मोदींनी गुजरात दौरा  केला. सध्या देशाचे पंतप्रधान म्हणुन कमी अन् गुजरात भाजपचा स्टार प्रचारक म्हणून अहोरात्र कष्ट करत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या कामाची उद्घाटनं झालीत कितीतरी  आश्‍वासनांची खैरात होत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपशासित सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे सर्व बडे नेते पदाधिकारी अन् आमदार -खासदार सगळी कामे सोडुन फक्त तुझ्यामुळे  गुजरात मध्ये दिवसरात्र राबत आहेत. राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यामुळे  अनेक आयटी अन् सोशल मिडीयाशी  संबंधित बेरोजगार इंजीनियर्सना  अच्छेदिन आले  आहेत.गुजरात मधील असंतोषाचा आवाज दडपण्यासाठी जुनी मढे उकरून हार्दिक पटेलचा बंदोबस्त करण्याची कुटील खेळी खेळली जात आहे.
एवढी प्रचंड यंत्रणा राहुल गांधीं आणि हार्दिक पटेलषसारख्या विरोधकांच्या   विरोधात उभी राहुन सुद्धा शांतपणे गेल्या महीनाभरात त्यांनी सगळ्यांनाच घाम फोडलाय. राहुल गांधी  मध्ये झालेल्या या आमुलाग्र बदलामुळे अनेकांची झोप उडाली आहे.तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य संचारलयं.
हे सर्व पाहून भाजप आणि मोदी यांची अस्वस्थता दिवासागणिक शिगेला पोहचत आहे. निवडणूक तारखा जाहिर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. प्रत्यक्ष प्रचार  आता वेग घेईल. मतदानानंतर मतमोजणीचा निकाल 18 डिसेंबरला येईल.या निकालात कोण जिंकले कोण हारले हे समजेल.तो निकाल काहीही असो पण आज तरी मोदींचा पप्पू,  हार्दिक पटेलचे आंदोलन जिंकले आहे,त्याचे श्रेय अर्थातच स्वतः राहुल गांधी, हार्दिक पटेल, गेहलोत आणि या निवडणूकीची प्रचार धुरा सांभाळणारे आ.बाळासाहेब थोरात यांनाच  द्यावे लागेल.