Breaking News

शिक्षक समन्वय समितीचा बदल्यांच्या नव्या धोरणाविरूद्ध 4 नोेव्हेंबर रोजी मोर्चा

हिंगोली, दि. 27, ऑक्टोबर - शिक्षक बदली धोरणाविरोधात सर्वच शिक्षक संघटना एकवटल्या असून बदली धोरणाचा विरोध करण्यासाठी शिक्षकांच्या वतीने येत्या 4 नोेव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाच्या शिक्षकांच्या बदलीबाबत नव्या धोरणाबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शिक्षक समन्वय समितीची बैठक  घेण्यात आली. तीन टप्यांत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सचिव सुभाष जिरवणकर यांनी दिली. शिक्षक बदलीच्या नवीन  धोरणाला शिक्षकांकडून सुरूवातीपासूनच विरोध केला जात आहे. तरीही शासन बदलीचा रेटा लावत आहे. त्यामुळे शिक्षक संघटना संघर्षाच्या पवित्र्यात उभ्या राहिल्या आहेत.