Breaking News

कलाकारांच्या हजेरीने प्रेक्षक घायाळ, कुस्त्यांचा हंगामाही रंगला

। मोहटा देवीची यात्रेचे समाप्ती, लाखो भाविकांनी घेतले दर्शन

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - मोहटादेवी यात्रेनिमीत्त गडाच्या पायथ्याला आयोजित कलाकारांच्या हजेरीने प्रेक्षक घायाळ झाले. तर दुपारनंतर  कुस्त्यांच्या  हंगाम्याने यात्रेचे सांगता झाली. यावेळी हजारो प्रेक्षक उपस्थित होते.
देवीच्या चरणी कलेचा नमुना पेश करत राज्यभर भटकंती करण्यासाठी कलाकार स्थलांतरित होतात.ही यात्रा लोककलाकारांची यात्रा म्हणूनही पाहिले जाते.भर  उन्हातही हजारो रसिकांनी सर्व कलाकारांना दाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला . मोहटे गावातील सर्व विश्‍वस्त देवस्थानचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत  कलाकारांचा सन्मान केला.
शारदीय नवरात्र महोत्सवा दरम्यान मोहटा देवस्थानची यात्रा दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी होउन द्वादशीच्या दिवशी सकाळी  गावात कलाकारांच्या हजेर्‍या होतात.  यामध्ये कलगीतुरा , गोंधळी गीते , आराधी गीते, गौळण, संबळ वादय वाजवणारे, भजनगायक, नकलाकार, विनोदी कलाकार, जादूगार, तमाशा कलावंत,यात्रेत  येतात. यात्रेकरूंचे मनोरंजन करत
लोकांकडून मिळणार्‍या बिदागीवर कलाकारांचा चरितार्थ चालतो. पावसाळा संपत आल्याने तमाशाचे फड दसर्‍यापासुन  पुन्हा रंगु लागतात. मोहटादेवीच्या आर्शिवादाने  पावसाळ्यापर्यंत काहीही अडचणी येत नाही. महिन्यातुन दोन दिवस भटकंती करणारे कलाकार गावी जाउन कटुंबीयांकडे देवघेव करतात . तमाशा कलावंताच्या कला  पाहण्यासाठी प्रचंड गर्दी  जमते. सुमारे तासभर फडातील सर्व कलाकार एकत्रितपणे देवीची सेवा म्हणुन मनोरंजन करतात . देवस्थान समितीतर्फ  सर्व कलावंतांना  प्रसाद स्वरूपात बिदागी दिली जाते. अन्य यात्रांमध्ये हजेर्‍यांचा कार्यक्रम होत असला तरी नवीन वर्षाची  सुरवात कला प्रकारात सादरीकरणात केलेले बदल याबाबत  नव्यारूपात कलेचा नमुना देवीच्या दरबारात सादर करून  पहिली सेवा तिला  अर्पण केली जाते. लोककलाकारांचे कुलदैवत म्हणुन देवीची उपासना त्यांचेकडून होते.  यात्रेदरम्यान  अन्य कलाकारांची ओळख होउन जिल्हा निहाय दौरे कसे असतील याची माहिती परस्परांना यात्रेत दिली जाते.