म.गांधीच्या विचारांची समाजाला गरज - प्रा.विधाते
अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - महात्मा गांधीजींच्या विचारांची समाजाला गरज आहे. त्यांच्या विचाराने स्वातंत्र्य भारताची मुहुर्तमेढ रोवली गेली. तरुणांना त्यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांची शिकवण आत्मसात केल्यास तन व मनाचे शुध्दीकरण होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच महात्मा गांधीचे विचार भावी पिढीत रुजविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्र पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक संजय झिंजे, दीपक सुळ, महिला राष्ट्रवादीच्या रेशमा आठरे, नगरसेवक संभाजी पवार, मोहन कदम, हनिफ जरीवाला आदि उपस्थित होते.