Breaking News

भगवान महावीरांच्या विचारांची गरज - म.सा.डॉ.पुण्यशीलाजी

भव्य शोभायात्रेत अबालवृध्दांचा सहभाग

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - शिर्डी लगत असलेल्या निमगाव-कोर्‍हाळे ते शिर्डी अशी भव्य आगम शोभा यात्रा जैन समाजाच्या वतीने काढण्यात आली  या आगम यात्रेला जैन समाजात मोठे असाधारण अशी महत्त्व आहे याभव्य शोभा यात्रेत म.सा.डॉ.पुण्यशीलाजी व म.सा.कीर्तीशिलाजी यांच्यासह जैन भाविक  सहभागी झाले होते जैन महिला व पुरुषांनी भव्य शोभा यात्रेत सहभाग घेतला होता ही शोभा यात्रा निमगाव येथील व्यापारी विजय चोपडा सुजाता चोपडा  वैभव चोपडा मनीषा चोपडा व श्रीमती हिराबाई चोपडा यांच्या निवास स्थानापासून थेट शिर्डी जैन मंदिर व जैन स्थानकापर्यंत काढण्यात आली होती  याप्रसंगी संघपती पुखराज लोढा साईआनंद पतसंस्थेचे चेअरमन विजय पारख नवयुवक मंडळाचे नरेश पारख आदींसह जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने  हजर होते या प्रसंगी बोलताना म.सा.पुण्यशीलाजी आपल्या प्रवचनात म्हणाल्या की भगवान महावीरांनी जगाला अहिंसाचा संदेश दिला असून  जिओ और  जिने दो हे तत्व जर मानव जातीने पालन केले तर जगात शांतता नांदेल असे स्पष्ट केले
भगवान महावीरांनी जगाला दिलेली शिकवण व आज ही धर्मग्रंथात सांगितलेल्या अनेक तत्व हजारो वर्षानंतर ही मानव जातीला प्रेरणा देणारे ठरत असून  धर्मग्रंथ व आगम यात्रा याचे महत्व विशद केले गेल्या तीन महिन्यांपासून जैन स्थानकात प्रवचनाच्या माध्यमातून विविध विषयांवर माहिती भावी पिढीला  महत्वाचे त्यातून जैन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगून समाजात एकता व एकजूट काळाची गरज असल्याचे  त्यांनी सांगितले या कालावधीत विविध धर्मिक कार्यक्रम भजनसंध्या लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी चोपडा परिवाराच्या वतीने सर्व  जैन बांधवांना चहा-पान नाश्ता देवून स्वगत करण्यात आले यावेळी विजय लोढा दीपक लोढा सुनील लोढा रमेश लोढा फुटरमल जैन दिलीप संकलेचा  निलेश संकलेचा प्रदीप बाफना तृप्ती लोढा चंदाबाई लोढा प्रेमाबाई लोढा मधुबाला लोढा सपना पारख भारती पारख हर्षा लोढा कल्पना बाफना कल्पना  संकलेचा सरिता लोढा आदींसह विविध महिला व जैन भाविक सहभागी झाले होते शिस्तबद्ध निघालेली ही शोभा यात्रा अनेकांचे लक्ष वेधून घेत होती
 चोपडा परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार हिराबाई चोपडा सुजाता चोपडा यांनी मानले.