Breaking News

सातार्‍यातील रस्त्यावरील फेरीवाले हटविण्याची ‘मनसे’कडे मागणी

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : सातारा बस स्थानक ते पोवई नाका आणि रविवार पेठ या परिसरात रस्त्याने चालणे अशक्य झाले आहे. याबाबत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फे रीवाले हटविण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी पुढाकार घेवून अनाधिकृत फेरीवाले हटवून रस्त्याचे फुटपाथ रीकामे  करावेत, अशी मागणी सातारकर नागरिक करू लागले आहेत.
मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात धाडसी नेते राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानक परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांना मनसेचा हिसका दाखवून दिला आहे. त्यारमुळे  मुंबईकर प्रवाशी आता सुखाने ये-जा करू लागले आहेत. मनसेच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत होत असल्याने इतर राजकीय पक्ष अडचणीत सापडले आहेत. या फेरीवाल्याकडून  लाखो रुपये हप्त्याच्या स्वरूपात वसूल केले जात होत. ती वसूली आता काही काळासाठी बंद पडली आहे. याचा आदर्श घेवून सातारा जिल्ह्यातील मनसेचे नेते संदीप मोझर,  शहराध्यक्ष राहुल पवार, कराडचे सामाजिक नेते दादा शिंगण व मान्यवरांनी याबाबत पुढाकार घेवून अनाधिकृत फेरीवाल्यासह हप्तेखोरांना धड़ा शिकवावा, अशी मागणी होऊ लागली  आहे.
सातारा जिल्हा हा सर्वच राजकीय पक्ष बालेकिल्ला समजतात. त्यामुळे अनाधिकृत फेरीवालेही त्यांचे भागीदार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम  विभाग, महसुल विभाग त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.  प्रसार माध्यमे विधायक उपक्रम म्हणून फेरीवाल्यांबाबत सड़ेतोड़ भूमिका मांडत असतात पण, सातारा येथे ठोस कारवाई  होताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशी व नागरिकांनी सातारा जिल्हातील मनसे दबंग नेत्यांकडे धाव घेतली आहे. या फेरीवाल्यांना सातार्‍यात फक्त मनसे वटणीवर आणू शकते असा  दावा काही नागरिक करत आहेत.
शहरातील रविवार पेठ ते शिक्षक बैंक रस्त्यावर मोठे प्रमाणात अनधिकृत फेरीवाले आहेत. हे परप्रांतिय असून काही फुटकाळ रोजभाई यांचे लाभार्थी बनले आहेत. या गोष्टी राज्यकर्ते  व शासकीय अधिकारी, पोलिसांना माहिती आहे. त्यांना मनसेकडून हिसका दाखवून द्यावा, अशी मागणी होत आहे. सातारकर जनतेने मुंबई, ठाणे, कल्याण येथील मनसे सैनिकांचे  कौतुक केले आहे.