Breaking News

एस. टी. कर्मचार्‍यांचे प्रश्‍न पाठपुरावा करुन सोडवणार - आ. संग्राम जगताप

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - एस.टी. कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत प्रश्‍नासाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स  काँग्रेस (इंटक) च्या वतीने मंगळवार दि.17 ऑक्टोबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून, सदर मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन, कामगारांना न्याय मिळवून  देण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने आ.संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिनकर लिपाने, सचिव सुरेश चौधरी, नगरसेवक कुमारसिंह  वाकळे, अजिंक्य बोरकर, बबलू जाधव, बी.आर. काळे, दिलीप मेहेर, शरद गडाख, आदिनाथ भुतकर, हरीभाऊ बुगे, वैभव वाघमारे, सुरवशे, एस.जी. खाडे, अमोल कोतकर, पी.डी.  मुठाळ, विजय जाधव आदि उपस्थित होते. 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांच्या वेतनवाढी कराराचा कालावधी दि.31 मार्च 2016 रोजी संपलेला आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीत 1950 अन्वये स्थापन  झालेल्या गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल राज्य परिवहन महामंडळ तसेच राज्यातील शासकीय उपक्रम महामंडळ व इतर मंडळातील कर्मचार्यांपेक्षा अत्यंत कमी वेतन  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांना मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व इतर महामंडळातील कर्मचार्‍यांना सहावा वेतन  आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांना अद्यापि सहावा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. यामुळे वेतनात मोठी तफावत  निर्माण होवून, कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती महागाई कर्मचार्‍यांना मिळणारा अत्यल्प पगाराने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, क र्मचार्‍यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.