Breaking News

बालनिरीक्षण गृहातील व्यवस्थापनाच्या चौकशीची मागणी

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - बालनिरीक्षणगृहातील मुलाने रिमांडहोमच्या परिसरात गळफास घेवून आत्महत्या केलेच्या घटनेचा निषेध व्यक्त करुन, परिस्थितीला जबाबदार  असणार्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी सोशल पीस कमिटीच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालया समोर कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करुन, निवासी  उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नलिनी गायकवाड, राजेंद्र बुंदेले, आशाताई निंबाळकर, नईम सरदार, अरुणा गोयल, शारदा वाघमारे, रिजवान  शेख, सुनिता बागडे, राजू देठे, सुधीर पवार, बाबासाहेब लोहकरे, जरीना पठाण, शहेबाज बॉक्सर, नाजीम शेख आदि उपस्थित होते.
घडलेली घटना दुर्देवी असल्याचे कमिटीच्या वतीने स्पष्ट करुन, रिमांडहोममध्ये मुलाच्या आत्महत्येने वसतीगृहातील विद्यार्थी भयभीत झाले आहेत. बालनिरीक्षणगृहात असलेला मुलगा  खोली बाहेर कसा आला?, पूर्वी सनी शिंदे नावाचा मुलगा पळून गेला असता त्याचा खून करण्यात आला. सातत्याने बालनिरीक्षण गृहातील मुले सुरक्षारक्षक असताना कशी पळून  जात आहे ?, रिमांडहोमच्या मुली व पोक्सो मधल्या पकडून आनलेल्या मुली एकाच ठिकाणी का ठेवण्यात येतात?, दक्षता समिती सदस्य रिमांडहोमच्या बॉडीवर का नाहीत?,  रिमांडहोमध्ये अशा घटना वारंवार का घडतात?, मुली व मुलांकडून झाडलोट व साफसफाईची कामे जबरदस्तीने का करुन घेतली जातात?, रिमांडहोमच्या बाहेर वाहनांची वर्दळ  असताना मुलांना गेटच्या बाहेर कचरा फेकण्यास का पाठविले जात असल्याचे प्रश्‍न कमिटीच्या वतीने उपस्थित करुन निवेदन देण्यात आले. बालनिरीक्षणगृहात असलेला अपुरा क र्मचारी वर्ग व त्यांच्या दुर्लक्षामुळे मुलांचे बळी जात असल्याचा आरोप कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर घटनेला जबाबदार असणार्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याची  मागणी पीस सोशल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.