Breaking News

विनापरवानगी गैरहजर राहणारा कर्मचारी बडतर्फ

नागपूर, दि. 27, ऑक्टोबर -  बेशिस्त वर्तणूक करणा-या कर्मचा-यांवर महावितरणने आता कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण आखले आहे. राज्यातील कुठल्याही भागात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी शिस्तभंग केल्यास त्यांना कठोर शिक्षा केली जाणार आहे. यासंदर्भातील नवीन धोरणावर महावितरणने अंमलबजावणी सुरू केली  आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठांच्या परवानगिशिवाय कामावर सातत्त्याने गैरहजर राहणा-या पांडूरंग बोकडे या तंत्रज्ञाला बडतर्फ़ करण्याची नोटीस महावितरणतर्फ़े बजाविण्यात  आली आहे. त्यामुळे वीज कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.
यासंदर्भात महावितरणच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर परिमंडळातील कुही ग्रामीण कार्यालयात कार्यरत पांडूरंग बोकडे हा कर्मचारी 4 मे पासून वरिष्ठ अधिका-यांच्या  पूर्वपरवानगिशिवाय सातत्त्याने गैरहजर होता. दरम्यान बोकडे 28 जुलै रोजी कामावर हजर झाता. त्यावेळी याबाबत जाब विचारला असता समाधानकारक खुलासा करण्यात असमर्थ  ठरल्याने उपविभागिय अधिकारी, कुही उपविभाग यांनी बोकडे यांचा सुटीचा अर्ज नामंजूर केला होता. महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी 25 आ ॅक्टोबर रोजी या भागातील डाँगरगाव उपकेंद्राला भेट दिली असता बोकडे हे त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी सातत्याने गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचेवर  त्वरीत कारवाईच्या सुचना यावेळि मुख्य अभियंता यांनी संबंधितांना दिल्या, त्याअनुषंगाने आज, गुरुवारी बोकडे यांना सदर नोटीस बजाविण्यात आली. या नोटीसनुसार बोकडे यास  महावितरणच्या सेवेतून बडतर्फ़ का करण्यात येऊ नये अशी विचारणा करण्यात आली असून यावर येत्या सात दिवसांत स्पष्टीकरण सादर न केल्यास बडतर्फ़ीची एकतर्फ़ी कारवाई क रण्याचा ईशाराही या नोटीस मध्ये बोकडे यांना देण्यात आला आहे.
विनापरवनगी कामावर गैरहजर असणे, मुख्यालयी वास्तव्यास नसणे, विजबिल वसुली हयगय करणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकडे दुर्लक्ष करणे, यासारखे प्रकार मुळीच खपवुन  घेतल्या जाणार नसून आपल्या कामाप्रती गांभिर्य नसलेल्या कर्मचा-यांवर सेवानियमनाच्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यास महावितरण प्रशासन गंभीर आहे. वीजग्राहकांना  उत्तमोत्तम सेवा देण्यास महावितरण कटीबद्ध असून कामात हयगय करणा-या इतरही अनेक कर्मचा-यांवर येत्या काही दिवसांत याप्रकारे कारवाई करण्याचा निर्धार महावितरण  प्रशासनाने केला आहे.