Breaking News

सणांच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या कारवाईत 9 लाखांचा अन्नपदार्थ साठा जप्त

सांगली, दि. 27, ऑक्टोबर - 4 पथके तयार करण्यात आली होती. या पथकामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 9 लाख 88 हजार 10 रूपये किंमतीचा  अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे नियुक्त केलेल्या पथकामार्फत मिरज तालुक्यातील आरग येथील संगीता एजन्सी येथून भेसळीच्या संशयावरून रिफाईंड सरकी तेलाचे 3  व खोबरेल तेलाचा 1 असे एकूण 4 नमुने घेण्यात आले. उर्वरित 1932.4 किलोचा 2 लाख 48 हजार 630 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तासगाव तालुक्यातील  डोर्ली येथील श्रीयश दुध संकलन केंद्र येथून भेसळीच्या संशयावरून गाय दुध 2, पांढरे द्रावण (अपमिश्रक), व्हे पावडर (अपमिश्रक), रिफाईंड पाम कर्नेल ऑइल (अपमिश्रक),  रिफाईंड सूर्यफूल तेल (अपमिश्रक) असे एकूण 6 नमुने घेवून उर्वरीत 1243.8 किलोचा 98 हजार 19 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. न्यू ऋतूराज ट्रेडर्स मार्केट यार्ड  सांगली येथून भेसळीच्या संशयावरून रिफाईंड सरकी तेलाचा 1 नमुना घेवून उर्वरीत 390 किलोचा 27 हजार 690 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. वाळवा  तालुक्यातील बिकानेर स्वीटस इस्लामपूर येथून भेसळीच्या संशयावरून शेव या अन्नपदार्थाचा 1 नमुना घेवून उर्वरीत 128 किलोचा 17 हजार 920 रूपये किंमतीचा साठा जप्त क रण्यात आला.
तसेच शिवबाबा मिठाई शॉपी, अभयनगर सांगली व संजय तोरडमल, फिरता विक्रेता, सांगली यांनी अस्वच्छ व रूम टेम्परेचरला साठवणूक केल्याच्या कारणावरून खव्याचा नमुना  घेवून त्यांच्याकडून प्रत्येकी 98 किलोचा 19 हजार 600 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. अंकल पार्सल्स ऍऩ्ड फार्वर्डस प्रा. लि. पार्सल ऑफीस, एसटी स्टँड सांगली  येथून भेसळीच्या संशयावरून व अस्वच्छ, रूम टेम्परेचरला साठवणूक केल्याच्या कारणावरून इंडीयन मिल्क स्वीटस 708 किलो, स्पे बर्फी 476 किलो, खवा 299 किलो एकूण  1 हजार 483 किलोचा 3 लाख 85 हजार 800 रूपये किंमतीचा साठा नमुने घेवून जप्त करण्यात आला. वाळवा तालुक्यातील पाटील ट्रेडर्स भवानीनगर येथून भेसळीच्या संशयावरू न रिफाईंड सोयाबीन तेल 223 किलो, रिफाईंड सरकी तेल 823 किलो एकूण 1 हजार 46 किलोचा 90 हजार 471 रूपये किंमतीचा साठा नमुने घेवून जप्त करण्यात आला.  तसेच तासगाव तालुक्यातील कापूर अग्रणी मिल्क ऍऩ्ड ऍग़्रो प्रोसेसिंग प्रा. लि. मांजर्डे येथून म्हैस दुध 1 हजार 637 लि. व स्कीम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक) 74 किलो, असा  एकूण 80 हजार 280 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
या कालावधीत एकूण 34 तपासण्या करून स्वच्छतेबाबत काळजी घेण्यासाठी व ग्राहकांना निर्भेळ अन्नपदार्थ पुरवण्याच्या सूचना दिल्या. खव्याचे 4, खाद्यतेलाचे 9, मिठाईचे 4,  दुधाचे 12 व इतर अन्न पदार्थांचे 17 नमुने तपासणीकरिता घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांनी दिली.