Breaking News

वाहतूक संघटनेचा देशव्यापी चक्का जाम

नवी दिल्ली, दि. 09, ऑक्टोबर - वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या जाचक अटी, डिझेलचे वाढलेले दर याविरोधात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट  काँग्रेसतर्फे आज आणि उद्या देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
जीएसटीतील काही अटींमुळे जुन्या गाड्यांच्या विक्रीसह इतर गाड्यांच्या विक्रीवर दुहेरी कराला प्रोत्साहन मिळत आहे. ई-मार्ग विधेयक आणि प्रस्तावित ई-वे बिल हे  परिवहन क्षेत्रासाठी अनुकूल नाही. जुन्या गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी लागू करू नये, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. संघटनेच्या वतीने आज आणि उद्या चक्काजाम  आंदोलन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भाजीपाल्यांचे दर कडाडू शकतात. ग्राहकांच्या गैरसोयीला सरकार जबाबदार  असेल, असंही संघटनेने म्हटलं आहे.