गोध्रा हत्याकांड : 11 जणांची फाशी रद्द
अहमदाबाद, दि. 09, ऑक्टोबर - गोध्रा हत्याकांडातील 11 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली असून या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं आहे. गुजरात हायकोर्टाने हा निर्णय दिला. शिवाय या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
गोध्रा हत्याकांडात 31 जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती. 11 आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांची शिक्षा आता जन्मठेपेत बदलली आहे. शिवाय 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.