Breaking News

राणेंनी स्थापन केला नवीन पक्ष

मुंबई, दि. 01, ऑस्टोबर - काँग्रसचे माजी नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे राणेंच्या नव्या पक्षाचं नाव असेल. मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे. लवकरच या पक्षाची नोंदणी करणार असल्याचं राणेंनी सांगितलं आहे. 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंनी काँग्रेसला रामराम केला होता. तसंच राणेंच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु होत्या. मात्र राणेंनी कुठल्याच पक्षात न जाता नवीन पक्षाची स्थापना केली आहे.