Breaking News

मुलांच्या अंगावरील दागिने चोरणारी टोळी जेरबंद

हिंगोली, दि. 02, ऑस्टोबर - गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणार्या महिलांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. याबाबत अधिक माहिती  अशी की, हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात रावण दहनच्या दिवशी मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत दसरा मैदानावर चोर्या करणार्या महिलांची  टोळी फिरत होती. लहान मुलाच्या अंगावरील दागिने काढून घेताना त्यांना पोलिसांनी पकडले. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यांची कसून चौकशी सुरू  असल्याची माहिती फौजदार तानाजी चेरले यांनी दिली.