Breaking News

अल्पदरात भुखंडाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - सिडको व वाळूज महानगर या ठिकाणी गोरगरिब जनतेला परवडेल, अशा अल्पदरात भूखंड उपलब्ध करुन द्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी फुले,  शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेच्या वतीने आज सकाळी सिडको कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सिडकोची घरे गोर-गरीब, ओबीसी, आदिवासी, दलित या  कष्टकर्यांना घेणे परवडत नाही. त्यामुळे सिडकोने या घटकांसाठी अल्पदरात घरे उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण  गगराणी यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे आंदोलन करीत असल्याचे परिषदेचे भीमराव सोनवणे यांनी सांगितले.