Breaking News

औरंगाबाद जिल्हयात 69 नवीन रेशन दुकाने उघडणार

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - जिल्ह्यातील 69 स्वस्त धान्य दुकानांना परवानगी देण्यासाठीचे प्रस्ताव ग्रामसभेत मांडण्यात येणार आहेत. पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील 69  नवीन स्वस्त धान्य दुकानांना परवानगी देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. औरंगाबाद शहरातील 2 दुकानांसाठी 53, ग्रामीणमधील 9 दुकानांसाठी 45 प्रस्ताव आले आहेत. क न्नड 7 साठी 16, गंगापूर 5 दुकानांसाठी 12सिल्लोड 10 दुकानांसाठी 23, खुलताबाद 9 दुकानांसाठी 15, व वैजापूर तालुक्यातील 19 दुकानांसाठी 59 प्रस्ताव जिल्हा प्रशासाकडे  आले आहेत.