Breaking News

चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा

धुळे, दि. 27, ऑक्टोबर - नजरचुकीने पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारताच्या लष्करी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. भारताची सीमा  ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी धरण्यात आले आहे.
चंदू चव्हाण हे मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत.
गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानवर 28 सप्टेंबरला लक्ष्यभेदी हल्ला केला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला चंदू चव्हाण नजरचुकीनने पाकिस्तानच्या हद्दीत गेले.  मात्र भारत सरकारने पूर्ण ताकद पणाला लावून चंदू चव्हाण यांना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 21 जानेवारीला भारतात आणण्यात आले होते. भारताची सीमा ओलांडून पाकि स्तानात गेल्यामुळे, लष्करी न्यायालयाने चंदू चव्हाण यांना दोषी धरत, तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली असली, तरी त्यावर अंतिम  शिक्कमोर्तब होणे बाकी आहे. संबंधित अधिकारी/कार्यालय या शिक्षेचा कालावधी कमी-जास्त करुन, शिक्षेला अंतिम रुप देतील.