Breaking News

रक्तदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - ऑक्टोबर महिना हा राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान महिना म्हणून साजरा केला जात असून रक्तदानाविषयीचे महत्व अधोरेखित व्हावे, यासाठी  जिल्हा  रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी आज  जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले  आहे.महिनाभरात  रक्तदानासंदर्भातील जनजागृतीसाठी रांगोळी  स्पर्धा, रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुमय्या खान यांनी दिली. 
दरवर्षी 1  ऑक्टोबर हा दिवस स्वैच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.. यावर्षी संपूर्ण  ऑक्टोबर महिना स्वैच्छिक रक्तदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे.यासाठी  विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. समाजामध्ये रक्तदानाचे महत्व रुजवणे, युवावर्गाला रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे, स्वैच्छिक रक्तदानासाठी सर्वांना प्रेरित करणे हा या मोहिमेचा उद्देश  आहे. रक्तदान करके देखो अच्छा लगता है, हे या मोहिमेचे घोषवाक्य असणार आहे.
याचाच एक भाग म्हणून  काल  जिल्हा रुग्णालय येथून सकाळी 8.30 वाजता जनजागृती रॅली काढण्यात अली.