Breaking News

नगर तालुक्यातील भारनियमन बंद करावे : कार्ले

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - नगर तलुक्यात सध्या चुकीच्या पध्दीने सुरु असलेले भारनियमन त्वरीत बंद करुन आगामी काळात कृषी विज पंप सुरु राहण्यासाठी नियोजन करावे अशी  मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी   केली. 
या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज विरतण कंपनीचे अधिक्षक अभियंता जीवन चव्हाण यांना निवेदन दिले.  सध्या नगर तालुक्यात चुकीच्या पध्दतीने भारनियमन सुरु आहे. रात्री 6.30 ते  9 या दरम्यान भारनियमन होत असल्याने त्याचा विद्यर्थ्यांच्या शालेय अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करावे , सध्या पाऊस चांगल्या  प्रमाणात होत  असल्याने दिवळी नंतर शेतकर्‍यांचे कृषी पंप सुरु राहणार आहेत.
त्यामुळे दिवसभरात शेतकर्‍यांची कृषी पंप सुरु राहण्यासाठी आतापासूनच विजेचे नियोजन करण्यात यावे विद्यूत जनित्र जळाल्यानंतर महाविरणकडून ते महिना दिडमहिना दुरुस्त करण्यात येत  नाही. 
यापुढील काळात विद्युत जिनींत्र नादुरुस्त होणार नाही याची दक्षता महावितरण कंपनीने घ्यावी व विजपूरवठा सुरळीत सुरु ठेवावा अशी मागणी कार्ले यांनी केली.
यावेळी नगर तलुक्यातील विजेच्या चुकीच्या भारनियमना विरोधात कार्यकारी अभियंता जीवन चवहण यांना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, समवेत राजू कराळे, मोहन बेरड, सुरेश बेरड,  सुरेश शिंदे, आसाराम वाघ, संदीप पानसरे, अंबादास ठोंबरे, शंकर बेरड, दीपक बेरड, विकास बेरड, शरद आढावा आदी उपस्थित होते.