Breaking News

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुरत येथून सुटका

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - येथील मुकुंदवाडी परिसरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील सुरत येथून सुटका करण्यात गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पो लिसांच्या संयुक्त पथकाला मंगळवारी यश आले. पीडितेला पळवून नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की,  येथील मुकुंदवाडी भागातील एक अल्पवयीन तरुणी 21 सप्टेंबर रोजी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती परत आली नाही. तिचा शोध घेतला असता समजले की  आरोपी वाकोडे आणि तिची मैत्री आहे. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यामुळे त्या संदर्भात पीडितेच्या वडिलांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पी डितेचा शोध घ्यावा यासाठी तक्रारदारांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेटही घेतली होती. आयुक्तांनी त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सायबर क्राइम, गुन्हे शाखा आणि  मुकुंदवाडी पोलिसांना याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश दिले, तेव्हापासून पोलीस संशयित आरोपी वाकोडेचा पत्ता शोधत होते. पळून गेल्यापासून तो नातेवाईक आणि  मित्रांशीही संपर्क साधत नव्हता. यामुळे पोलिसांची अडचण होत होती. असे असताना पोलिसांनी त्याला शोधून काढले. तो आणि पीडिता राहत असलेल्या सुरत येथील अमरोली  भागातील घरावर छापा मारून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना औरंगाबादेत आणले. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार आरोपीने तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार के ल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे.