अमित शहांच्या मुलावर एवढी कृपादृष्टी कशासाठी?
दि. 11, ऑक्टोबर - काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालेल्या कथित गैरव्यवहारावरून या सरकारला त्या वेळश्ी भाजपच्या नेत्यांनी सातत्यानं आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं होतं. खोटेनाटे आरोप करायचे, संबंधितांविरोधात संशयात वातावरण तयार करायचं आणि अंगलट यायला लागलं, की तो निवडणुकीच्या प्रचाराचा भाग होता, असं सांगून मोकळं व्हायचं, ही भाजपची नीती होती. संत रामदास म्हणतात, पेरिले ते उगवते, बोलिल्यासारखे उत्तर येते. भाजपच्या बाबतीत आता तसं व्हायला लागलं आहे. शरद पवार यांच्याविरोधात ट्रक भर पुरावे देण्याची भाषा करणार्यांना प्रत्यक्षात न्यायालयात एक चिठोरीही देता आली नाही. याचा अर्थ काँग्रेसच्या नेत्यांचे हात स्वच्छ होते, असं अजिुबात नाही; परंतु कणभर असलं, की मनभर करायचं, ही भाजपची नीती असते. आता काँग्रेसनंही ती शिकून घेतली आहे. समाजमाध्यमांचा वापर असो, की बेफाट आरोप; भाजपला आता त्याचा सामना करावा लागणार. पार्टी वुईथ डिफरन्स असं म्हणणार्या भाजपची स्थिती इतरांपेक्षा वेगळी नाही, हे बंगारू लक्ष्मण, येदियुरप्पा यांच्यापासून अमित शहा यांच्यापर्यंतचे नेते ज्या रांगेत बसलेले दिसतात आणि देश पादाक्रांत करण्यासाठी मळलेल्या अन्य पक्षीय नेत्यांना ज्या पद्धतीनं स्वच्छ करून घेतलं जात आहे, त्यावरून भाजपची वाटचाल मळलेल्या वाटेवरून होत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात कॅगनं मारलेला पत्येक ताशेरा म्हणजे गैरव्यवहार असं धरून भाजपनं काँगेसला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं होतं. भाजप सत्तेवर आल्यानंतर जेव्हा क ॅगनं ताशेरे ओढले, तेव्हा असं झालं असतं, तर असा नफा झाला असता, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही, अशी भूमिका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतली. कॅगनं काँगेसच्या काळात मारलेले ताशेरे आणि त्यात झालेलं नुकसानही त्याच पकारचं दाखविण्यात आलं होतं, याचा भाजपला सोईस्कर विसर पडला. काँगेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या पकरणावरून तर भाजपनं काँगेसला सातत्यानं घेरलं होतं. आता भाजपला काँगेसनं त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे राष् ्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचं नुकतंच उघड झालेलं पकरण म्हणलं तर गंभीर आहे. मार्च 2014 पर्यंत तोटयात चालणारी जय शहा यांची कंपनी भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर अचानक कशी फॉर्मात आली? पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्ट अप आणि नोटाबंदीचा खरा लाभार्थी जय शहा आहे का, अशी जी शंका उपस्थित केली गेली, त्यावर लोकांचा सहज विश्वास बसू शक तो. ज्या वायर नावाच्या संकेत स्थळानं पथम हे वृत्त दिलं आहे, त्यांच्यावर शंभर कोटींच्या बदनामीच्या खटल्याचा दावा ठोकण्याचा इशारा जय शहा यांच्याकडून दिला गेला असला, तरी त्यानंतर दोन वृत्तपत्रांनी शहा यांच्या कंपनीच्या कर्जाबाबतची जी कागदपत्रं संक ेतस्थळावर टाकली आहेत, ती पाहलिी, तर लोकांच्या मनातील संशय आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही बातमी पहिल्यांदा पसिद्ध क रणार्या रोहिणी सिंह नावाच्या पत्रकाराच्या बदनामीची मोहीम भाजपनं हाती घेतली असली, तरी याच रोहिणी सिंह यांनी वढेरा यांच्या यांच्या जमीन व्यवहारांचं पकरण बाहेर काढलं होतं, त्या वेळी हा भाजप रोहिणी सिंह यांना डोक्यावर घेऊन नाचत होता. जय शहा यांच्या व्यवसायात अल्पावधीत झालेली तब्बल सोळा हजार पटींची वाढ हा शंकेचाच विषय ठरू शकतो. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्या खात्यात सापडलेली एक कोटी 16 लाखांची रक्कम जर भाजप सरकारला संशयाची वाटत असेल आणि त्यावरून त्यांना थेट अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागत असेल, तर अचानक 80 कोटींच्या वर गेलेल्या व्यवसायाच्या चौकशीची मागणी केली,तर त्याला दोष देता येणार नाही. जय शहांच्या या पक रणाची चर्चा सुरू असतानाच तिकडं कर्नाटकातही भाजपचे दोन दिग्गज नेते काँगेसच्या विरोधात बदनामीची बनावट कथा रचताना रंगेहाथ सापडले आहेत. कर्नाटकात लवकरच निवडणुका होत आहेत. त्यामुळं तेथील सत्तारूढ काँगेसला भष्टाचारांच्या कथांमध्ये क सं गुंतवायचं, याची येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेची सीडी उजेडात आली आणि त्यावरून या दोघांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून गुन्हा दाखल झाला आहे. जगातल्या कोणत्याही मोठया व बडया कंपनीचा क ारभार कायदेशीर किंवा बेकायदेशीर अशा कोणत्याही मार्गानं झाला, तरी तिची संपत्ती तीन वर्षांत 16 हजार पटींनी वाढत नाही. त्यातही नोटाबंदीनंतर ही कंपनी लगेच का बंद केली जाते, याचं उत्तरही मिळत नाही. शहा यांचे पुत्र जय यांनी टेंपलर नावाची कंपनी स्थापन केली. 2006 पर्यंत मध्ये कंपनीचा कारभार नव्हता. 2016 मध्ये कंपनीची उलाढाल 80 कोटी रुपयांवर पोहोचली. या कं पनीस केआयएफएस फायनान्सनं तारण न घेता 15 कोटींचं कर्ज दिलं. जय शहा यांची कुसुम किन्सर्व्ह नावाची दुसरी कंपनी आहे. या कंपनीला 2 कोटी 6 लाखांचं डिपॉझिट 1015 मध्ये मिळालं, तर 4 कोटी 90 लाखांचं कर्ज दुसर्या एका अनोळखी कंपनीकडून मिळालं. कुसुमनं पुढं मध्य पदेशातील रतलाममध्ये पवन ऊर्जा पकल्प उभारला. या पकल्पास निरमा कंपनीशी संबधित बँकेनं 25 कोटींचं कर्ज दिलं. त्यापोटी कंपनीनं फक्त 6 कोटी तारण दिलं. या कंपनीत यशपाल चुडासामा भागीदार आहेत, ज्यांच्यावर सोहराबुद्दीन चकमक खटल्यात साक्षीदारावर दबाव आणल्यापकरणी सीबीआयनं खटला दाखल केला होता. अनोळखी कंपनी पाच कोटीचं कर्ज कसं देऊ शकते आणि सहा कोटींच्या तारणावर 25 कोटींचं कर्ज कसं मिळतं, हे तुम्हा-आम्हाला पडणारे पश्न नेत्यांच्या कुटुंबीयांना कर्ज देताना पडत नसतात. नोटबंदीनंतर केंद्र सरकारनं 2 लाख शेल कंपन्यावर (अवैध पैसा वळवणार्या) कारवाई केली. शहा यांच्या कंपन्या शेल कंपन्या होत्या, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणलं आहे. जय शहा यांच्या कंपनीला ऊर्जामंत्री पियूष गोयल यांच्या मांलयातील इंडियन ई रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए) या कंपनीनं 10 कोटी 35 लाखांचं कर्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. गोयल यांनी घाईघाईनं शहा यांच्या कंपनीवरील आरोपांचा खुलासा करण्यामागचं खरं कारण हे आहे. शहा यांची कुसुम फिनसर्व्ह ही कंपनी शेअर बाजारात कार्यरत होती. अशा कंपनीला मध्य पदेशातील रतलाम येथील 2.1 मेगावॉटच्या पकल्पासाठी ऊर्जा खात्याच्या आयआरईडीए या कंपनीनं कर्ज दिलं. आयआरईडीए ही सरकारी कंपनी फक्त एक मेगावा ॅटच्या पकल्पालाच मंजुरी देऊ शकते. हा नियम त्या कंपनीच्या वेबसाइटवर नमूद आहे; पण तो नियम गुंडाळून ठेवत जय शहा यांच्या कंपनीला 10 कोटी 35 लाखांचं कर्ज आयआरईडीएनं दिलं. इथंही नियम धाब्यावर बसविण्यात गोयल यांचा हातभार होता, हे आता स्पष्ट झालं आहे. जय शहा यांच्या टेम्पल एंटरपाइजेसला 51 कोटींची रक्कम विदेशातून कोणत्या कामासाठी आली? कोणी दिली? का दिली? असे पश्न उपस्थित होतात. या कंपनीनं एका खोलीचं भाडं 80 लाख रुपये पति महिना दाखविलं आहे. या खोलीत असं काय होतं?