Breaking News

महिंद्राच्या उत्पादक सुविधा अधिक प्रकाशमय करण्यासाठी एलइडी बदल उपक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - भारताने पॅरिस क्लायमेटमध्ये एकमताने आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअँडएम लिमिटेड)सारख्या संस्थांद्वारे महत्त्वाकांक्षी ध्येयेसमोर ठेवली  आहेत. आणि एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीने ही ध्येय पूर्ण व्हावीत यासाठी उत्तम पाऊल पुढे टाकले आहे. ईईएसएल आणि 19 अब्ज यूएस डा ॅलर्सच्या महिंद्रा ग्रूपचा भाग असलेल्या एमअँडएम लिमिटेडतर्फे, भारतातील महिंद्राच्या 18 उत्पादक सुविधांमध्ये ऊर्जा सक्षमतेसह (ईई) एलइडी बदल उपक्रम संलग्नितपणे राबवण्याचे  आज जाहीर केले आहे. भागीदार ईईएसएल ही पहिली खासगी क्षेत्रातील ऊर्जा सक्षम उपकरणांना प्रोत्साहन देणारी कंपनी आहे, याद्वारे ईई उत्पादने स्वीकारण्यासाठी खासगी क्षेत्राला  प्रोत्साहन दिले जाते.
एलइडी लाइट बसवल्यामुळे प्रति वर्षं तब्बल 20 दशलक्ष युनिट्सची बचत होते. महिंद्राने या प्रकल्पात 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तांत्रिक साहाय्य, दरांची सक्षम  तजवीज आणि या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सेवा ईईएसएलद्वारे सर्व महिंद्रांच्या सुविधांमध्ये पुरवल्या जातील.
याशिवाय महिंद्राच्या 6 उत्पादक सुविधा इतर ऊर्जा बचतीच्या संधी शोधण्यासाठी वापरल्या जातील, यात वाया जाणार्‍या ऊर्जेची बचत. ऊर्जा सक्षम मोटर आणि तापवणे, हवा  खेळती राहणे आणि एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी) इत्यादींचा समावेश आहे. ईईएसएलद्वारे महिंद्राच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देईल, तसेच नवीन ऊर्जा सक्षमीकरण साधनांचा वापर  करणे आणि ऊर्जेचे संवर्धन करण्यास शिकणे यासारख्या गोष्टींमध्ये त्यांना सक्षम केले जाईल. ईईएसएल उपक्रमाअंतर्गत महिंद्रा ऊर्जेची गरजसक्षमपणे आणि परवडणार्‍या किंमतीत  व्यवस्थापित करू शकणार आहे.
या उपक्रमाबद्दल ईईएसएलचे एमडी सौरभ कुमार म्हणाले की, ॠॠभारतातील कॉर्पोरेट्स आणि मोठ्या सुविधा क्षेत्रांतऊर्जा सक्षम जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या  भागीदारीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महिंद्रा अँड महिंद्राने हा उपक्रम हाती घेतला आणि उद्योगक्षेत्रापुढे उदाहरण घालून दिले आहे, यासाठी आम्ही अतिशय आनंदी आहोत. ईई  उत्पादकांच्या स्वीकृतीमुळे ऊर्जा बचत होऊन प्रक्रियेचा खर्चही कमी होणार आहे, यासाठी आम्ही अधिक संलग्नितपणे कामाचा विचार करू. भारत सरकारने भारतातील ऊर्जा सक्षम  बाजारपेठांमध्ये क्रांती घडवली आहे आणि उजालासारख्या माध्यमातून नागरिकांमध्ये ईई उत्पादकांच्या वापराचा दृष्टीकोनच बदलला आहे.’’
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले की, ॠॠईईएसएलबरोबर भागीदारी ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, यामुळे आमच्या  उत्पादक सुविधा अधिकाधिक ऊर्जा सक्षम होणार आहेत. महिंद्राने व्यवसायात नेहमीत शाश्‍वत दृष्टीकोनाला महत्त्व दिले आहे, यामुळेच आमच्या भागीदारांचा विकास होण्यास मदत  झाली आहे. एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही ऊर्जा सक्षम उत्पादनांचा केवळ स्वीकारच केला नाही, तर आमच्या उत्पादक सुविधांमध्ये आमचे पुरवठादार, वितरक भागीदार आ णि कर्मचारी यांना स्वीकृतीसाठी प्रोत्साहन दिले आहे, शिवाय कार्बन उत्सर्जन कमी करून आपले भविष्य अधिक स्वच्छ, स्मार्ट आणि हरित करण्याचा प्रयत्न केला आहे.’’
2030 सालापर्यंत आपली ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्यास वचनबद्ध असलेली महिंद्रा ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे. प्रति टन कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी कंपनीने  तब्बल 10 यूएस डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. ईईएसएलच्या भागीदारीमुळे आम्ही आमची वचनपूर्तता अधिक सक्षमपणे पूर्ण करू शकणार आहोत.
या वर्षीच्या जागतिक पर्यावरण महिन्यात (जून 2017) महिंद्राने उजाला योजनेचे उद्घाटन केले, हे उद्घाटन ईईएसएलबरोबर करण्यात आले, यामुळे भारतभरातील कर्मचारी आपल्या  घरी ऊर्जा सक्षमीकरण करू शकतील. या विशेष उजाला योजनेअंतर्गत कर्मचारी ऊर्जा सक्षम ट्यूब लाइट्स, बल्ब आणि फॅन अतिशय उत्तम किंमतीत प्राप्त करू शकतील. उजाला  योजनेला 20,000 कर्मचार्‍यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. यासारखाच सकारात्मक प्रतिसाद महिंद्राच्या पुरवठादार आणि वितरकांकडून प्राप्त करण्यात आला आहे.
ईईएसएलद्वारेउर्जा सक्षमीकरण उपक्रमात सरकारला सहाय्य केले जाणार आहे आणि इतर सार्वजनिक आणि खासगी भागीदारांना ऊर्जा सक्षमीकरण स्वीकारण्यात येणार्‍या  अडचणींमधून बाहेर काढता येणार आहे. ईईएसएलद्वारे उभारणीतील गुंतागुंत सोडवण्यासाठी उर्जा ऑडिटचे आयोजन केले जात आहे, याद्वारे तांत्रिक-व्यावसायिकदृष्ट्या उर्जा सक्षमीक रण प्रमाण (ईईएम) विकसित केले जाणार आहे आणि तेही एकत्रित शुल्काच्या आधारावर. ऊर्जा सक्षमीकरणानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मालकांना ईईएसएलद्वारे तांत्रिक  आणि इतर आर्थिक पाठिंबा दिला जाणार आहे. बहुतांश प्रशासकीय इमारतींमध्ये ईई उत्पादने बसवण्यात आली आहेत आणि ईईएसएलने पीडब्ल्यूडी महाराष्ट्र, निती आयोग, निर्माण  भवन, जम्मू सेक्रेटरीएट. विद्युत भवन आणि राजीव चौक मेट्रो स्टेशन यासारख्या ठिकाणी उपकरणांचे प्रस्थापन पूर्ण केले आहे आणि याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर ऊ र्जेची बचत होत आहे.
महिंद्रा ऊर्जा सक्षमीकरणापलिकडे जाऊन शाश्‍वत परिणाम घडवते. वॉटर पॉझिटिव कॉर्पोरेशन हार्नेसिंगमधून संपूर्ण महिंद्रा ग्रूपद्वारे 12 पटीने पाण्याचा उपसा होतो, हे पाणी सूक्ष्म  सिंचन व्यवसाय आणि पाणलोट क्षेत्र विकास उपक्रमासाठी वापरले जाते. यापैकी वाया गेलेले केवळ 12 टक्के पाणी भरावांमध्ये जाते आणि त्याचाही वापर केला जातो, यामुळे पाणी  अजिबात वाया न जाऊ देता भरावाचा वापर करणारी ही संस्था ठरली आहे. महिंद्राचा इगतपुरी प्लांट हा भारतातील पहिल्या आणि जगातील दुसर्‍या क्रमांकावरील भरावात गेल्याने  शून्य टक्के पाणी वाया जाणारा प्लांट म्हणून मान्यता मिळाली आहे. महिंद्राने इलेक्ट्रॉनिक कार आणि सूक्ष्म सिंचन यासारख्या हरित व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे, यामुळे प्रत्यक्ष  ठिकाणी शाश्‍वत प्रयोगांची मदत होते.
भारतात जोमदार ऊर्जा सक्षमीकरणाचा प्रसार होत आहे, याद्वारे आयएनडीसी ध्येये प्राप्त केली जात आहेत, आणि प्रशासनाच्या उर्जा सक्षमीकरण दृष्टीकोनातील भाग म्हणून कॉर्पोरेट  मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ईईएसएलच्या उन्नत जीवनसारख्या ऊर्जा सक्षमीकरण उपक्रमात परवडणार्‍या किंमतीतील एलइडी आणि सर्वांसाठी उपकरणे (उजाला), स्ट्रीट लाइट  नॅशनल प्रोग्रॅम (एसएलएनपी), म्युन्सिपल एनर्जी एफिशिअंट पंप (एमईईपी) आणि महिंद्रासारख्या सर्व संबंधित कॉर्पोरेट्ससाठी ऊर्जा सक्षमीकरण उपक्रम उभारणी आदी उपक्रम  राबवले जात आहेत. ईईएसएलचे कार्य हे देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार करणे हे आहे आणि महिंद्रा ही अशा कंपन्यांपैकी एक कंपनी आहे,  जी ईईएसएलच्या इ-वाहन उपक्रमाचा भाग म्हणून इलेक्ट्रीक वाहनांचे संवर्धन करत आहे.
भारतात कमीत कमी कार्बन अर्थयंत्रणेची निर्मिती व्हावी या दृष्टीकोनातून उपक्रमांची संकल्पना करणे आणि त्यांना सुरुवात करणे यासाठी ईईएसएल आणि महिंद्रांने भागीदारीत ठोस  पावले उचचली आहेत.