Breaking News

किमान आधारभूत दराने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

सांगली, दि. 27, ऑक्टोबर - शेतकर्‍यांनी नोंदणी करण्यासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड व बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स सोबत घेऊन जावे. खरेदी केंद्रावर कें द्रशासनाने निश्‍चित केलेल्या स्फेसीफिकेशनप्रमाणे एफएक्यू प्रतीचा माल आणावा. शेतकर्‍यांनी मालाची चाळणी करूनच खरेदी केंद्रावर माल आणावा. तसेच माल पूर्णपणे वाळवून  आणावा, ज्यामध्ये कमाल आर्द्रता (ओलावा) 12 टक्के पर्यंत असावी. शेतमाल खरेदीचा दिनांक व वेळ एसएमएसव्दारे शेतकर्‍यांना कळविण्यात येईल. जेणेकरून त्यांना प्रतीक्षा क रावी लागणार नाही. शेतमालाच्या खरेदीनंतर शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात एका आठवड्याच्या आत रक्कम जमा केली जाईल, असे पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे  यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.