Breaking News

कोपर्डी खटला : आरोपींमुळेच सुनावणीला विलंब लागला - उज्ज्वल निकम

नगर, दि. 27, ऑक्टोबर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सुनावणी सरकारी पक्षामुळे नाही तर आरोपींमुळेच आठ वेळा होऊ शकली नाही, असे विशेष सरकारी वकील उ ज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर 13 जुलै 2016 रोजी अत्याचार व खून करण्यात आला. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयात अंतिम युक्तीवादाला सुरुवात  झाली. शनिवारपर्यंत खटल्याची दररोज सुनावणी होणार आहे. निकम यांच्या युक्तीवादानंतर आरोपींच्या वकिलांकडून युक्तीवाद केला जाणार आहे.
या खटल्यात वकील निकम यांनी आरोपींविरुद्धच्या पुराव्यांची यादीच विषद केली. या खटल्यादरम्यान काही जणांकडून न्यायालयाबाहेर अनेक वक्तव्ये करण्यात आली. याबाबत निक म यांनी या वेळी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आरोपी विरोधात सरकारी पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले साक्षीदार व पुराव्यातून आरोपींनी केलेले कृत्य सिद्ध होते.  एखादा व्यक्ती खोटे बोलू शकतो पण परिस्थिती कधीच खोटे बोलत नाही, असेही निकम म्हणाले.