Breaking News

महापौर मुक्ता टिळक यांना कचर्‍याची भेट

पुणे, दि. 27, ऑक्टोबर - पुण्याचा प्रश्‍न पेटण्याची चिन्हे असून हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे आणि अशोक कांबळे यांनी आज महापौर मुक्ता टिळक  यांना कचर्‍याची भेट देत हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्‍या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केला. या कचरा प्रकल्पासंदर्भात सकारात्मक  विचार न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशाराही ससाणे यांनी यावेळी दिला. हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे.  त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी  तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. याविषयी महापौर मुक्ता टिळक यांना विचारणा केली असता त्यांनी रामटेकडी येथील कचरा प्रकल्पावर लोकप्रतिनीधींची बैठक घेऊन तोडगा  काढण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी ससाणे यांनी हडपसरमधील कचरा प्रकल्पाच्या नियोजित जागेऐवजी शहरात इतर ठिकाणी पर्यायी जागा शोधावी, अशी मागणी के लीदरम्यान मंगळवारी (24 ऑक्टोबर) पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथील रॉकेम प्रकल्पात पाठविण्यात येणार्‍या कचर्‍याच्या गाड्या अडवून सनदशीर  मार्गानी गाड्या परत पाठून स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे आणि नागरिकांनी हडपसर येथे आंदोलन केले होते.