Breaking News

पोहण्यासाठी तळ्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - पोहण्यासाठी तळ्यामध्ये उतरलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बूडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. 23 ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोहगाव  येथील हरणतळे वस्ती जवळ असलेल्या तळ्यात घडली. अजय सुधाकर पारळे (वय-18 रा. विश्रांतवाडगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुण काही  मित्रांसमवेत पोहण्यासाठी दुपारी तळ्यावर गेला होता. पोहत असताना दुपारी दोन-अडीचच्या सुमारास तो तळ्यामधे बुडाला. अग्निशमन दलाला सायंकाळी सव्वाचार वाजता माहिती  मिळाल्यानंतर शोध घेतला असता सायकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी मृतदेह तळ्यातून बाहेर काढला.