Breaking News

‘जिओ टॅगिंग’ मुळे अपघात होणार कमी !

ठाणे, दि. 24, ऑक्टोबर - कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटातील अपघाती जागा तसेच पालघर, जव्हार परिसरातील रस्त्यांवरील अपघाती व अतिधोकादायक  रस्त्यांची ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट्स’ म्हणून नोंद झाल्याने या ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट्स’ चे लवकरच जिओ टॅगिंग होणार आहे. त्यामुऴे संबंधीत रस्त्यावरून धावणा-या वाहनातील  स्क्रीनसह मोबाईलवरदेखील ‘अपघात स्थळ’ जवळ आल्याचे वाहनचालकास सूचित होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्ग आदी रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणा-या ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात सुमारे  दोन हजार 301 ठिकाणांची नोंद ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट्स’ म्हणून झाली आहे.
रस्त्यांवरील या अपघाती व धोकादायक ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स ’ म्हणून घोषित करण्यासाठी विविध निकष लावण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यावरील कोणताही 500 मीटरचा  असा भाग जिथे गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झालेल्या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांवरील अपघातांमध्ये किमान दहा व्यक्तींचा मृत्यू झाला व गंभीर जखमी  असलेल्या ठिकाणांचा ब्लॅक स्पॉट निश्‍चित केले आहेत. या ‘ब्लॅक स्पॉट’ अपघात ठिकाणांचे जिओ टॅगिंग करून दरवर्षी सुमारे 10 टक्के अपघातांमध्ये घट करण्याचा प्रयत्न केला  जात आहे.
यामध्ये माळशेज घाटातून जाणा-या 222 क्रमांकाच्या राष्ट्रीय य महामार्गावर ठिकठिकाणी एक हजार 230 ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ शोधण्यात आले, असे मुख्य कार्यकारी अ भियंत्या तृप्ती नाग यांनी सांगितले. तर पालघर व जव्हार येथील बांधकाम विभागाने 71 अपघाती ठिकाणे जिओ टॅगिंगसाठी शोधले आहेत.