सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे ऊस पेमेंट व व्याज बँकेत वर्ग
6 कोटी 76 लाख 36 हजार 720 रुपये बँकेत जमा
अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचे सन 2016-17 या गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसास दरटनी 100 रुपयांप्रमाणे ऊस पेमेंट व ठेवीवरील व्याज तसेच सिझन 1993 -94 मधील परतीच्या ठेवीचे पेमेंट असे एकुण 6 कोटी 76 लाख 36 हजार 720 रुपये बँकेत जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अॅड.माधवराव कानवडे यांनी दिली आहे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर असून ऊस उत्पादकांना नेहमी जास्तीचा भाव देण्यास आग्रेसर राहिलेला आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयामुळे मा.संचालक मंडळाने 5 हजार 500 मे.टन साखर कारखाना विस्तारीकरणासह आधुनिकीकरण व 30 मेगावॅट वीज क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प कमी कालावधीत कार्यान्वीत झाला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचे सन 2016-17 गळीतास आलेल्या ऊसास यापूर्वी दर टनी 2400 रुपये अॅडव्हान्स पेमेंट अदा केलेले असून दिवाळीनिमित्त 100 रुपयांप्रमाणे एकूण रक्कम रुपये 4 कोटी 10 लाख 85 हजार 150 रुपये बँकेत वर्ग केले आहे. यामुळे ऊस उत्पादकांना प्रति टन 2500 रुपये प्रमाणे भाव मिळाला आहे. व सभासदांच्या 30/09/2016 अखेर ठेवीवरील व्याज पेमेंट 2 कोटी 16 लाख 28 हजार 500 रुपये तसेच सन 1993 - 94 ची सभासद परतीची ठेव नं.1 रुपये 49 लाख 23 हजार 70 रुपये अशी एकूण रक्कम 6 कोटी 76 लाख 36 हजार 720 रुपये बँकेत जमा झाले आहे.
या कारखान्याने अडचणीच्या काळात सन 2015 - 2016 हंगामात चांगले ऊस गाळप करुन ऊस उत्पादकांना वेळेवर ऊस पेमेंट व कारखाना कामगारांना दरवर्षीप्रमाणे 20 टक्के बोनस व एक महिन्याचे सानुग्रह दिल्यामुळे सभासद व ऊस उत्पादक व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.ऊस उत्पादकांनी आपआपले ऊस पेमेंट पेमेंट प्रोग्रामप्रमाणे बँकेतून घेवून जाण्याचे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब कुटे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.