Breaking News

‘इसिस’ला डहाणूच्या युवकाकडून आर्थिक मदत

मुंबई, दि. 02, ऑक्टोबर - डहाणूतील अबू नबिल या तरुणाने भारतातून गोळा केलेले 40 लाख रुपयांची रक्कम, ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेला  इराक आणि सीरियामध्ये पोहोचविल्याची घटना समोर आली आहे. ‘इसिस’च्या प्रचाराने डोके भडकलेले अनेक भारतीय तरुणांनी इसिसमध्ये भरती झाल्याचे  यापूर्वीच उघड झाले आहे. अशा काही तरुणांना त्या वाटेने जात असताना पकडले गेले, परंतु अबू नबिलसंबंधीच्या या तपासाने ‘इसिस’ला भारतातून मोठा  वित्तपुरवठाही झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एमबीए असलेला अबू नबिल दुबईत नोकरी करत असून त्याने भारतातील मुस्लिमांकडून ‘जकात’ची रक्कम गोळा केली व ती पैसे हस्तांतरणाच्या अधिकृत मार्गांचा  अवलंब करून, ‘इसिस’साठी लढणा-यांना राक्का आणि अन्बार प्रांतात पोहोचविण्याची व्यवस्था केली. अबू नबिलने हे पैसे ‘बिस्ट ऑफ इस्लाम’च्या नावाने  पाठविल्याचे दिसते.