Breaking News

मुंबईतील सोसायट्यांमधील केवळ 100 किलो कचराच पालिका उचलणार

मुंबई, दि. 02, ऑक्टोबर - मुंबई महापालिकेने आजपासून मुंबईतल्या मोठ्या रहिवासी इमारतींमधला कचरा न उचलण्याचा निर्णय एका परिपत्रकाद्वारे जारी केला  आहे. तसेच सर्व रहिवासी सोसायट्यांनी इमारतीच्या आवारातच ओला, सुका कचरा वेगवेगळा करुन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी, असा  आदेश या परिपत्रकात देण्यात आला आहे.
2 ऑक्टोबरपर्यंत सोसायट्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी होणे शक्य नसल्याने सोसायट्यांना कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यासाठी 3 महिने  मुदतवाढ देण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीबाबत ज्या संकुलांनी महापालिकेकडे मुदतवाढीसाठी अर्ज केलेल्या संकुलांनी लेखी हमी दिल्यास त्यांना  3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.