जालन्यातील अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये अडीच लाख रूपयांना विक्री
जालना, दि. 03, ऑक्टोबर - जालन्यातील एका अल्पवयीन मुलीस राजस्थानमध्ये अडीच लाख रूपयांना विकल्याची घटना घडली असून विकण्याचा उदयोग करणारी महिला ही जालन्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात शिपाई म्हणून काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जालना पोसिलांना राजस्थानला जावुन त्या मुलीची सुटका करून आणले आहे.
सदर मुलगी ही गरीब घरची असून तिचे पालक राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा. बांधकाम विभाग क्वॉर्टर्स, जालना ) हिच्याकडे तिला कामासाठी पाठवत असत त्या मुलीला गोड गोड बोलुन राधिकान औरंगाबादला नेले तेथे तिची विक्री झाली नाही म्हणुन पुण्यात नेले मात्र राधिकाला हवी तेवढी रक्कम पुण्यातीला ग्राहक देण्यास तयार नव्हता म्हणून तिने तिला थेट राजस्थानला नेले. तेथे सुजितकुमार मोतीलाल लोहार (रा.वृषभदेव. जि. उदयपूर, राजस्थान)यांस तिला अडीच लाखाला विकून पैसे घेवून ती परत आली विकत घेतल्या दिवसांपून सुजितकुमार रोज त्या मुलीवर अत्त्याचार करत होता, गेल्या आठवडयात मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या पालकांना राधिकाचा संशय आला कारण ती मुलगी राधिकाच्या प्रभावा खागली गेली होती. मुलीचा जबाब घेतल्या नंतर जालना पोलिसंनी राधिका व सुजितकुमारला अटक केली असून तपास चालु आहे.