Breaking News

संकटातील सहकारी संस्थांना राज्य शासनाने मदतीचा हात द्यावा- राज्यपाल श्रीनिवास पाटील

सांगली, दि. 24, ऑक्टोबर - राज्यातील सहकारी संस्था कोणत्या कारणाने आल्या, यावरच कालापव्यय न करता या सहकारी संस्थांना राज्य शासनाने संरक्षण देऊन त्यांना उ र्जितावस्था द्यावी व संकटातील सहकार क्षेत्राला नवसंजीवनी द्यावी, असे प्रतिपादन सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठानच्यावतीने सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या विविध कार्यकारी सहकारी  सोसायटी, त्यांचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांना श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते सहकारमहर्षि गुलाबराव पाटील पुरस्कार देऊन सन्मानित क रण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयंत पाटील, मोहनराव कदम  व माजी आमदार हाङ्गिज धत्तुरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट विविध कार्यकारी सहकारी सोसायटी म्हणून दक्षिण भाग भिलवडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी  (भिलवडी), समडोळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (समडोळी) व शिंदेवाडी (हिंगणगाव) विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (शिंदेवाडी), उत्कृष्ट विकास सोसायटी सचिव-  अण्णासाहेब कुंभार (कर्नाळ विकास सोसायटी), अनिल पाटील (दुधगाव उत्तर भाग विकास सोसायटी) व आमाण्णा गावडे (अंकलखोप विकास सोसायटी), उत्कृष्ट सांगली जिल्हा  मध्यवर्ती बँक शाखा- कडेपूर (ता. तासगाव), देशिंग (ता. कवठेमहांकाळ) व बावची (ता. वाळवा), तर उत्कृष्ट सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी/ कर्मचारी म्हणून तानाजी  काशिद (सिनिअर असिस्टंट, मार्केट यार्ड, शाखा- जत), श्रीमती सुनिता पाटील (शाखाधिकारी, मार्केट यार्ड, शाखा- सांगली) व शशिकांत माने (ज्युनिअर असिस्टंट, शाखा- क वठेमहांकाळ) यांचा गौरव करण्यात आला.
सहकारमहर्षि वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यातील सहकारी संस्था बुडल्या म्हणू नका, तर डबघाईला आल्या. अशा सहकारी संस्थांना सहकार क्षेत्राच्या  माध्यमातून उभा करण्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार व्यक्त करून श्रीनिवास पाटील म्हणाले, की राज्य शासनाने अशा सहकारी  संस्थांना ओट्यात घेण्याची गरज आहे. शक्य तितकी मदत करून त्यांना पुन्हा उभारण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प सहकारपंढरी असलेल्या सांगली जिल्ह्यातूनच व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून याच सहकार पंढरीतून यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व  बाळासाहेब विखे- पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून लोकनेते राजारामबापू पाटील व गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रात एक आदर्शवत काम उभे केले. गुलाबराव पाटील  यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पाया घातला. त्यांच्या आदर्शावरच आजही या बँकेची वाटचाल सुरू असून आता बँकेने साडे पाच हजार कोटी रूपये ठेवीचे उद्दिष्ट ठेवावे.  गुलाबराव पाटील यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार राज्यातील अन्य सहकारी संस्थांना अभिमानास्पद ठरेल, असेही श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.