Breaking News

मनमाडमध्ये लाल कांद्याला 3100 रुपये भाव

मनमाड, दि. 24, ऑक्टोबर - दिवाळी निमित्त बंद असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरु झाले.गेल्या आठ दिवसापासून ओस पडलेले बाजार  समितीचे आवार पुन्हा शेतकर्‍यांच्या गर्दीमुळे गजबजले आहे.तब्बल आठ दिवसाच्या सुट्टी नंतर बाजार समितीत लिलाव सुरु झाले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी कांदा  आणला होता.
आज लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये,जास्तीत जास्त 3100 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. उन्हाळ कांद्याला कमीत कमी 900 रुपये,  जास्तीत जास्त 2150 रुपये तर सरासरी 1850 रुपये प्रती क्विंटल भाव होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत जास्ती जास्त भावात क्विंटल मागे 400 रुपये तर सरासरी भावात 750  वाढ झाल्याचे पाहून बळीराजा सुखावला आहे.
दिवाळीनिमित्त गेल्या आठदिवसापासून बाजार समितीत सुट्टी होती. दिवाळी संपल्यानंतर आजपासून बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरु झाल्यामुळे लिलावासाठी मोठ्या प्रमाणात  शेतकरी कांदा घेऊन आले होते.
सकाळी 10 वाजता लिलाव सुरु झाल्यानंतर लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये जास्तीत जास्त 3100 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. कांद्याला  कमीत कमी 900 रुपये,जास्तीत जास्त 2150 रुपये तर सरासरी 1850 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला गेल्या आठवड्यात लाल कांद्याला कमीत कमी 800 रुपये, जास्ती जास्त  2150 तर सरासरी 1800 रुपये तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 700 रुपये, जास्तीजास्त 1600 रुपये आणि सरासरी 1450 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. कांद्याच्या  भावात झालेली वाढ पाहून बळीराजा सुखावला आहे. आगामी काळातही कांद्याचे भाव टिकून राहतील असे व्यापार्‍यांनी सांगितले.