Breaking News

गळयावर खंजीर ठेवून भर रस्त्यात व्यापा-याची लुट

हिंगोली, दि. 24, ऑक्टोबर - गळयावर खंजीराचे टोक ठेवून एका व्यापा-याला दरोडेखोरांनी रस्त्यावर लुटल्याची घटना सेनगाव हिंगोली मार्गावर घडली.
नांदेड येथील ओमप्रकाश सोमाणी हे ऑईल व ग्रीसचा व्यापार करण्यासाठी प्रवास करत होते.काल रविवारी रात्री ते एक पिकअप गाडी ठरवून त्यातून प्रवास करत सेनगावला आले  तेथे अर्थिक व्यवहार झाल्यानंतर दोन साथीदारांसह त्याच गाडीतून नांदेडला परत निघाले रात्री आठ ते नउच्या दरम्यान
सेनगाव- हिंगोली मार्गावर खुडूज पाटीजवळ त्यांची गाडी दोन दुचाकीस्वारांनी अडवली आणि सोमाणीसह त्यांच्या साथीदारांना खंजीराचा धाक दाखवत त्यांच्याकडे पैशाच्या मागणी  केली. एकाने सोमाणी यांच्या गळयाला खंजीर लावत आणि त्यांच्याकडील रोख 1 लाख 17 हजार रुपये लुटले. त्याच बरोबर तिघांचे मोबाईल व पिकअप वाहनाची चावी घेवून ते  पसार झाले. नंतर येणार्या जाणार्यांमार्फत सदर घटनेची खबर देवून सोमाणी यांनी पोलिसांची मदत मिळविली.