Breaking News

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे

पुणे, दि. 27, ऑक्टोबर - पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) च्या अध्यक्षपदी तुकाम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा पदभार विभागीय आयुक्त  चंद्रकांत दळवी यांच्याकडे होता.प्राधिकारणाच्या अध्यक्षपदाचा पदभार हा 2004 पासून विभागीय आयुक्तांकडे होता. मात्र राज्य शासनाने प्रथमच प्राधिकरण अध्यक्षपदी एका स्वतंत्र  अधिका-यांची नेमणूक केली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे पीएमपीएमपीएमएलचे संचालकपद आहे त्या बरोबरच त्यांच्याकडे आता प्राधिकरणाचे अध्यक्षपदही देण्यात आले  आहे.पीएमपीएमएलने मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा आत्तापर्यंत अनुभव घेतला आहे. मुंढे यांच्या नेमणुकीमुळे प्राधिकरणाचे रखडलेले गृहप्रकल्प, भूसंपादनाचा प्रश्‍न, झोपडपट्टी अतिक्रमण,  अनधिकृत बांधकामे, रिकामे भूखंड विकसीत करण्याचे आव्हान असे अनेक प्रश्‍न आता मार्गी लागतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.प्राधिकरणाचा सर्वात मोठा व  चिघळलेला प्रश्‍न म्हणजे रिंग रोड. या प्रश्‍नालाही तुकाराम मुंढे मार्गी लावतील अशी आशाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे प्राधिकरणाच्या कामकाजाला क शापद्धतीने वेग देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.