Breaking News

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला नॅक कडून ए ग्रेड

दर्जा व गुणवत्तेत संजीवनी संस्था अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द,मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली माहिती

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद,नवी दिल्ली(नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अक्रीडिटेशन कौन्सिल-नॅक)या स्वायत्त  संस्थेने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अनेक निकषांचे आधारे मुल्यांकन करून ए ग्रेड हा दर्जा दिला असुन या महाविद्यालयाने दर्जा व गुणवत्तेमध्ये अग्रेसर असल्याचे पुन्हा  एकदा सिध्द केले आहे.नॅकच्या ए ग्रेड मुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे,अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.
अमित कोल्हे यांनी म्हणाले की,संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यशाबद्धल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे,संजीवनी ग्रुपचे  संस्थापक,माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि आ.स्नेहलता कोल्हे यांनी व्यवस्थापन,प्राचार्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय  ग्रामीण भागात असुनही दर्जेदार शिक्षणाचे कार्य करीत आहे.या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कायम संलग्नता मिळालेली असुन राष्ट्रीय प्रमाणन मंडळ,नवी दिल्ली (नॅशनल बोर्ड ऑफ अक्रीडिटेशन-एन.बी.ए.) कडूनही या महाविद्यालयाने सन 2002 पासुन सलग माणांकन प्राप्त केले आहे.संजीवनीच्या अधिपत्याखालील पालिटेक्निकला यापुर्वीच  एन.बी.ए.मानांकण प्राप्त झाले असुन महाराष्ट्रात फक्त पाच पालिटेक्निक एन.बी.ए.मानांकित आहे.फार्मसी महाविद्यालयालयालाही यापुर्वीच एन.बी.ए.मानांकन व नॅक चा ए दर्जा मिळाला  आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फार थोडे अभियांत्रिकी महाविद्यालये एन.बी.ए.मानांकित व नॅक ए ग्रेड दर्जा प्राप्त आहे त्यात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय अग्रेसर आहे.तसेच  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय संशोधन,दर्जा आणि गुणवत्तेच्या आधारे देशात 53 व्या क्रमांकावर असल्याचे आऊटलुक मॅगेझिनच्या सर्वेक्षणातुन सिध्द झाले आहे.ज्या महा विद्यालयांना स्वतःच्या दर्जा व गुणवत्तेवर विश्‍वास आहे अशीच महाविद्यालये नॅकच्या कसोट्याांना सामोरे जाण्यासाठी अर्ज करतात.संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वतःच्या  क्षमतांबाबत आत्मविश्‍वास असल्यामुळे नॅकच्या मुख्यालयाकडे मुल्यांकनासाठी अर्ज केला होता.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अर्जानुसार नॅक कमिटीने या महाविद्यालयातील अद्यापन-अध्ययन पध्दती,ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत नामांकित कंपन्यांमध्ये  विध्यार्थ्यांना मिळणार्‍या नोकर्‍या,विविध ठिकाणी राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या शोध निबंध,प्रकल्प प्रदर्शने स्पर्धां मधिल विद्यार्थी व प्राद्यापकांनी मिळविलेले बक्षिसे, विद्यार्थी व प्राद्यापकांनी केलेले संषोधने व त्यांचे पेटंट रजिस्ट्रेशन,पुरेशा संख्येने व उच्च शिक्षित प्राद्यापक वर्ग,उत्कृष्ट निकालाची परंपरा आणि विद्यापीठ गुणवत्ता यादीत सातत्याने  झळकणारे विद्यार्थी,सुसज्य प्रयोगशाळा,स्वच्छता,इत्यादी बाबींबरोबरच वसतिगृह सुविधा,बस सुविधा,वीज व पाणी व्यवस्था इत्यादी बाबींचे परीक्षण केले.प्राचार्य डॉ.डी.एन.क्यातनवार  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राद्यापकांनी आपापल्या विभागांतर्गत असलेल्या जबाबदार्‍यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.याच बरोबर नॅक कमिटीने माजी विद्यार्थी,माजी विद्यार्थी नोकरीस  असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी,पालक,सध्याचे विद्यार्थी आणि प्राद्यापकांशी संवाद साधला.संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.