Breaking News

बक्षिसाची रक्कम बंधारे बांधकामासाठी खर्च करणार

सातारा, दि. 23, ऑक्टोबर - हिंदी चित्रपट अभिनेते अभिताभ बच्चन यांचा सहभाग असलेल्या सोनी टीव्ही बच्चन चॅनेल वरील लोकप्रिय कौन बनेगा करोडपतीया कार्यक्रमात बक्षिस  स्वरुपात जिकलेले पन्नास लाख रुपये ग्रामीण भागातील शालेय मुलींना सायकल वाटप व दुष्काळी भागात पावसाचे पाणी आडविण्यास सिमेंट क्राँक्रिट बंधारे बांधकामासाठी खर्च क रणार आहे. हे बक्षिस माणदेशी महिलांना दिपावली सणाची अनोखी भेट मिळाली आहे अशी प्रतिक्रिया म्हसवड येथील माणदेशी फौंडेशन व माणदेशी महिला सहकारी बँकेच्या  संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी व्यक्त केली.
सोनी टीव्ही चॅनेलवर काल ( ता.20) रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षपित करण्यात आला.
या कार्यक्रमानंतर श्रीमती चेतना सिन्हा व या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व माणदेशी महिलांवर काल रात्री पासुन सुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला आहे.
या यशाबद्दल व दिपावली निमित्त मोठ्या संख्येने भेटीस आलेले आप्तेष्ट, हितचिंतक व माणदेशी महिलांच्या सुभेच्छा स्विकारण्यास व भेटीस आलेल्यांनाही सुभेच्छा देण्यास श्रीमती  सिन्हा या आज सकाळ पासुन माणदेशी फौंडेशन व महिला बँकेच्या येथील कार्यालयातच थांबुन होत्या.
त्या म्हणाल्या ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील सुमारे साडेतीन लाख महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम व स्वयंपुर्ण करण्यास माणदेशी फौंडेशन व  महिलां बँकेच्या साह्याने दिलेल्या योगदानाची दखल घेऊन अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्ही वरील लोकप्रिय कार्यक्रमास मला व फौंडेशनमध्ये सामाजिक  कार्यात सहभागी झालेल्या महिलांना निमंत्रित करण्यात आले.
या कार्यक्रमात माझे सहकारी म्हणुन हिंदी चित्रपट अभिनेते आयुष्यमान खुराणा होते.या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसाचे क्रमवार  प्रश्‍नांची उत्तरे देण्यास सहकार्यांच्या मदतीने यश आले. तो क्षण माझे विशेषत: माणदेशी महिलांचाही अस्मरणिय असाच सुखद असा ठरला व आम्हास खुपच आनंद झाला.
विशेषबाब म्हणजे या कार्यक्रमाच्या मदतीने अमिताभ बच्चन यांना ग्रामीण व दुष्काळी भागातील आम्हां सहकारी महिलांना भेटण्याची अपुर्व अशी संधी मिळाली.
टीव्हीवर हा कार्यक्रम सुरु होताच व त्यानंतरही या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माणदेशी महिलांवर अभिनंदनाचा सुरु झालेला वर्षाव दिपावली सात द्विगुणित आनंद देणारा ठरला.
माण तालुक्यात अल्प पाऊस पडतो,वारंवार दुष्काळाचे अस्मानी संकट हि नित्याचीच बाब परंतु सन 2012 -13 मधील माण देशातील दुष्काळाने चांगलाच बडा शिकविला.पाणी व  चारा टंचाईमुळे भुकेने व्याकुळ झालेल्या जनावरांची हालआपेष्ठा पाहुन माझे पता विजय सिन्हा यांनी शासनाच्या अर्थिक पदतीची प्रतिक्षा न करता माणदेशी फौंडेशनच्या माध्यमाने  लहान- मोठ्या जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करुन देण्याबाबतचा हट्ट धरला होता.माणदेशी फौंडेशन महिलांसाठी असुन जनावरास चारा-पाणी देणे या फौंडेशनमधील महिलांना क से शक्य होणार ? असा गंभीर प्रश्‍न आमचे समोर होता.तरीही हे आवाहन स्विकारुन सुमारे सात- आठ हजार जनावरास चारा-पाणी उपलब्ध करुन दिला. भविष्यात असे संकट  पुन्हा येऊच नये यासाठी वेळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पड लेल्या अल्प पावसाचा थेंबनाथेंब साठवुन ठेवण्यासाठी माण नदी व माण तालुक्यातील ओढे- नाले आडवण्याक ामी दहा सिमेंट बंधारे बांधले व परिणामी त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई संपुष्टात आणण्यात यश आले.
ग्रामीण भागात राहत्या घरापासुन माध्यमिक हायस्कुल या शाळा खुपच दुर अंतरावर आहेत. परिणामी अनेक शालेय मुली शिक्षण अर्धवट सोडुन घरीच राहणे भाग पडत असल्याची  वस्तुस्थिती माझे निदर्शनास आली.यावर पर्याय म्हणुन माणदेशी फौंडेशनच्यावतीने शालेय मुलीस मोफत सायकल वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे हा उपक्रम आणखी  प्रभावशाली करण्यासाठी कौन बनेगा करोडपती मधुन मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मुलींना सायकल खरेदीसाठी खर्च करणार आहोत व हे सर्व माणदेशीचे
उपक्रम भविष्यातही कार्यरत ठेवण्यास आता अमिताभ
यांच्या कार्यक्रमानंतर आम्हा माणदेशी महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळाले आहे.