Breaking News

भाजपाचे फसवे बी नावालाही शिल्लक ठेवणार नाही - धनंजय मुंडे

सातारा, दि. 23, ऑक्टोबर - मागच्या निवडणुकीत अवघा देश फसला आहे. साडेतीन वर्षात देश सर्व पातळीवर मागे पडला असून प्रचंड महागाई वाढली आहे. फेकोगिरी करत  चमकोगिरी करणार्या या मोदी व फडणवीस सरकारला हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, अजित दादांच्या नेतृत्वाखाली व  सर्वसामान्य जनतेच्या भरवशावर ही संताजी-धनाजी (मुंडे - आ. शिंदे) जोडगोळी भाजपाचे हे फसवे बी उभ्या महाराष्ट्रात नावालाही शिल्लक ठेवणार नाही, अशी भीष्मगर्जना राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली.
आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ल्हासुर्णे ता. कोरेगाव येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन, उद्घाटन समारंभ व जाहिर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी  विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, सौ वैशाली शिंदे, आ. मकरंद पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, तेजस शिंदे, नगराध्यक्ष  राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, जि.प.सदस्य जयवंत भोसले, संजय पिसाळ, जयवंत घोरपडे, सौ सुरेखा पाटील, सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय  साळुंखे यांची उपस्थिती होती. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे शेतकरी सन्मान योजना काढून राज्य सरकारने जनतेची निराशा व घोर फसवणूक केली  आहे. आता सरकार जाण्याची वेळ आली आहे. ज्यावेळी जनतेच्या पोटात खायला काय नसते तेव्हा देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यात कोट्यवधी रुपयांची करोडो शौचालय बांधायची  कल्पना येते. मन की बातमध्ये शब्दांची साखरपेरणी करणार्या कल्पना बहाद्दर पंतप्रधानांच्या नोटबंदीमुळे काळ्या पैशावाल्यांचे काहीच नुकसान झाले नाही. सर्व पातळ्यांवर हे सरकार  फसले आहे. त्यामुळे जनहित व सर्वांगिण विकासाची दुरदृष्टी असणार्या शरद पवार यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा सर्वांनी मोहोर उमटवून राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम रहावे. राज्याच्या  नेतृत्वासाठी आ. शशिकांत शिंदे यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
ना.रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मला सभापती म्हणून मर्यादा आहेत. शरद पवार यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्‍वास आहे. मागचं उणे दुणे न काढता पक्षाची ध्येय धोरणे  तळागाळात पोहोचवा. केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले असून त्यांची मुस्कटदाबी होऊ लागली आहे. हे सकार बोलघेवडे आहे. अव्वल स्थानी असणारे राज्य पिछाडीवर  आणण्याचे काम कोणी करु नये अथवा होवू नये यासाठी आमची धडपड सुरु असते.आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कोेरेगाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनता माझ्यावर  कुटुंबवत प्रेम करते, यातच माझ्या कामाचे सार्थक आहे. सत्ता असो वा नसो तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मागे ताकद उभी केल्याने माझी आणखी जबाबदारी वाढली आहे. आ. श शिकांत शिंदे व सौ. वैशाली शिंदे यांचा चांदीची तलवार देवून व गुलाबाच्या मोठ्या हारात गुंफून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भास्कर कदम यांनी केले. सुत्रसंचलन संतोष क णसे तर आभार प्रदर्शन अरुण माने यांनी केले. कार्यक्रमास अरुण माने आप्पा, राजेश पाटील, संभाजीराव गायकवाड, संतोश शिर्के, विठ्ठल गोळे, बाळासो सोळस्कर, सुनिल माने,  आनंदा कोरे यासह विविध मान्यवर उपस्थित होते.