Breaking News

सोरेगाव वृद्धाश्रम, स्मशानभूमीतील सेवेकर्‍यांना फराळाचे वाटप

सोलापूर, दि. 18, ऑक्टोबर - शहर पोलिस आयुक्तालय मुख्यालयात काम करणारे सफाई कामगार, कार्यालयीन कामगारांना पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते कपडे,  फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते, निरीक्षक यशवंत केडगे, शंकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे पन्नासहून अधिक क र्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ वाटप झाले. श्री तांबडे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. चार- पाच वर्षांपासून उपक्रम सुरू आहे. फराळ वाटपानंतर महिला कर्मचार्‍यांच्या  चेहर्‍यावर आनंद फुलला होता.सोरेगावयेथील वृद्धाश्रमात सदर बझार पोलिस ठाण्यातर्फे फराळ वाटप करण्यात आले. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, वृद्धाश्रमाचे प्रमुख ब्रिजमोहन  फोफलिया, पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांच्या हस्ते फराळ वाटप झाले. मागील तीन वर्षांपासून श्री. अंकुशकर हा उपक्रम राबवितात.निकाळजे संस्था शांतीसागर संघातर्फे  गरजूंना फराळ, कपडे दिले. या वेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, श्रीशैल बनशेट्टी, योगेश कुंदूर, अशोक निंबर्गी, अनिल तालीकोटी, शाम पाटील उपस्थित होते.