Breaking News

आळंदी बस स्थानकातून प्रवासी महिलेची सोन साखळी चोरली

पुणे, दि. 18, ऑक्टोबर - आळंदी येथील पुणे महानगर परिवहन सेवेच्या बस स्थानकात बस मध्ये बसत असताना एका वृद्ध महिलेची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.  रंजना अरविंद पवार (वय 60 वर्ष,रा,कात्रज पुणे) यांनी आळंदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना पवार या आळंदी येथील बस स्थानकात उभ्या  असलेल्या बसमध्ये बसत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीची तीन तोळ्यांची सोनसाखळी चोरुन नेली. दिवाळी सणामुळे बसला गर्दी  असल्याने याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सोनसाखळी चोरुन नेली.पोलीस नाईक बी.एन.क्षीरसागर तपास करीत आहेत.