... म्हणून भाजपच्या कमळ चिन्हावर लढवली निवडणूक - महेंद्र कांबळे
पुणे, दि. 15, ऑक्टोबर - महापालिकेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आरपीआय प्रयत्नशील होती. अजित पवार यांनी तसा शब्दही दिला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने उमेदवार देऊन आम्हाला फसविले म्हणून भाजपचे ‘कमळ’ चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागल्याचे आरपीआयचे शहराध्यक्ष महिंद्र कांबळे यांनी म्हटले आहे.पालिकेच्या प्रभाग 21अ मधील पोटनिवडणुकीत विजयी उमेदवार हिमाली कांबळे यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट ) सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते . पालिकेची पोटनिवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत आम्ही गेलो होतो. मात्र, शहराध्यक्ष, गटनेते आणि स्वत: अजित पवार यांनी हेकेखोरपणा केला. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय गायकवाड यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव झाला असल्याची टीका कांबळे यांनी केली आहे.